समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या वादानंतर जवळपास १४ महिन्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘समय रैना Still Alive’ हा व्हिडीओ त्याने ७ एप्रिलला युट्यूबवर शेअर केला आणि अवघ्या काही तासातच या व्हिडीओला करोडो व्ह्यूज आले. समय रैनाच्या या व्हिडीओबाबत सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्याच्या कमबॅकचं कौतुक केलंय. तर, बहुतांश लोकांनी समयवर टीका केली आहे. समयने पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून शिवीगाळ करून मर्यादा ओलांडल्याची टीका त्याच्यावर करण्यात येत आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनीही समय रैनासह सध्याची तरुणपिढी स्टँडअप शोमध्ये ज्या सहजतेने शिवीगाळ करतेय यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “तरुणांची Vocabulary बदललीये, दर दोन वाक्याला कोण शिवीगाळ करतं? तुम्ही घरात सुद्धा असंच बोलता का?” असा स्पष्ट सवाल स्वप्नील राजशेखर यांनी या पोस्टच्या मार्फत विचारला आहे. एक ‘भाषाप्रेमी’ म्हणून त्यांनी ही पोस्ट लिहित आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.

स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

असं पाहा… की….

काही नाही, सगळेच यावर बोलतायत…
आपण नाही बोललो तर उगाच FOMO का काय तो येतो मग आपल्याला…

माझं बाकी काहीच म्हणणं नाही..
पण समय रैना आणि या समस्तच स्टँडअपवाल्यांनी तरुणांची Vocabulary बदलून ठेवलीय…
किंवा काही अपशब्द स्टेजवरुन सतत-सतत वापरुन Coool सहज करुन ठेवलीये…

आणि Unreal आहे हे…
दर दोन वाक्याला भेंXX, लंX, गांX, लौX, बहन के XX, मा के XX
कोण बोलत असं नॉर्मली?
बरं, घरात सुध्दा हे असंच बोलतात?
“अरे पापा…. क्या बताऊ आपको!! मा XX गई भेंXX ट्राफिक मै..
मेरे तो XX लग गए… आगे एक बहन XX खडा था…
हिल ही नही रहा था भेंXX !! मेरी तो XX फट गई….”

असं नसतील बोलत ना…
अगदी मित्रात सुध्दा सतत असं बोलत असतील हे खरं वाटत नाही…. मग स्टेजवर उभं राहून प्रत्येक दोन वाक्याला हे का? काय कूल आहे यात?

सध्या समय रैनाच्या Still Alive ची भलावण करणारेही “त्यातली अश्लीलता वगळून, शिवीगाळ वगळून पाहा” म्हणतायत…. तर का वगळा?

बरं, हिंदी वाल्यांची जोरदार सद्दी बघून मराठी स्टँडअपवाले पण चेकाळलेत…

आता मराठीत तर “मला भिती वाटली” “मला काळजी वाटली” “माझ्यावर दडपण आलं” “मी घाबरलो/घाबरले” या सगळ्या एक्सप्रेशन्ससाठी “माझी फाXX” “फाXX हातात आली” हे रुळलंय…
भितीच्या सगळ्या भावना एकाच अवयवाशी आणून ठेवल्यात आपण….

शाळेच्या पोरासोरं निबंधात “फाXX” लिहितायत याचे रील्स पाहिले आपण…
माझ्याच सेटवरच्या चिमुकलीने माझ्यावर गमतीने कविता करताना
“माझे आबा पाटील पाटील
ते रागवले तर सगळ्यांची फाटील”
अशी केली… काय बोलावं?!!

बरं… माझ्या काही भावना वगैरे दुखावत नाहीत याने.. पण वाईट वाटतं… हळहळ वाटते… एवढी समृध्द संपन्न भाषा आपली… ती अशी संकुचित का होतेय…. पोरांना तिची समृध्दी कळू दे तर…

एवढं आणि इतकंच तेही एक भाषाप्रेमी म्हणून वाटतं..
बाकी चालू दे…

दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा सहमती दर्शवली आहे. “सर खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी पोस्ट आहे”, “अगदी मनातलं बोललात सर..प्रत्येक शब्द पटला”, “यात आपले मराठीतील पण काही आहेत..जे त्यांच्या स्टेज शोला नुसतं अश्लील बोलणं हाच अजेंडा ठेवून कार्यक्रम करत असतात”, “बरोबर पोस्ट लिहिलीत सर” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.