Samidha Guru Bhargavi Chirmule Lavani: बॉलीवूड गाण्यावर केलेली लावणी तुम्ही पाहिलीय का? आता अशाच प्रकारचा डान्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कलाकारही कमेंट्स करीत या डान्सचे कौतुक करीत आहेत. आता हा डान्स व्हिडीओ कोणी शेअर केला आहे, कोणत्या गाण्यावर त्याचे सादरीकरण केले गेलेय, तसेच नेटकरी नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊ…
‘शरारत’ गाण्यावर समीधा गुरू व भार्गवी चिरमुलेने सादर केली लावणी
अभिनेत्री समीधा गुरूने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्याबरोबर अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला लावणीचे संगीत ऐकायला मिळते. त्या त्याच्यावर सादरीकरण करतात. ऐका… असे म्हणतात आणि त्यानंतर धुरंधर या सिनेमातील शरारत गाणे ऐकायला मिळते. या गाण्यावर त्या गाण्याच्या काही डान्स स्टेप्स आणि लावणी अशा भन्नाट संमिश्रणाचे सादरीकरण पाहायला मिळते. त्यांची ऊर्जा, गाण्याच्या बोलानुसार अचूक डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा कोरिओग्राफरही दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना समीधाने लिहिले, “शरारती लावणी. आमच्या लाडक्या चेतनने ही भन्नाट कोरिओग्राफी केली आहे. खूप मजा, खूप धमाल आणि खूप सारी शरारत, असे तिने लिहिले आहे.
नेटकरी म्हणाले…
या व्हिडीओवर स्वप्नील जोशी, ऋतुजा जुन्नरकर, शर्वरी कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करीत या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. तसेच अनेक नेटकरांनीसुद्धा कमेंट करीत त्यांचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “खूप सुंदर.” दुसऱ्या एकाने लिहिले, “तिघेही किती सुंदर नाचतात.” आणखी एकाने लिहिले, “एकच नंबर.” एका नेटकऱ्याने लिहिले, “अप्रतिम सादरीकरण.” एकाने लिहिले, “खूप खूप छान.” आणखी एकाने लिहिले, “फारच सुंदर नृत्याविष्कार. हे नृत्यकौशल्याबरोबरच स्मरणशक्तीचंही काम आहे. स्त्रिया नृत्य करतात हे आपण बघत आलो आहोतच; पण पुरुष कलाकारही मागे नाहीत हे विशेष आहे.” एकाने लिहिले, “बापरे! कसली खतरनाक लावणी आहे”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.





डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या धुरंधर या सिनेमाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई करीत या सिनेमाने जुने रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड तयार केले. या सिनेमाची गोष्ट जितकी प्रेक्षकांना आवडली, तितकीच सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. याच सिनेमातील शररात हे गाणे व्हायरल झाले होते. त्यावर अनेकांनी डान्स केला होता. मात्र, या मराठमोळ्या अभिनेत्रीनी यावर केलेले अशा प्रकारचे सादरीकरण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
दरम्यान, समीधा व भार्गवी यांनी आजपर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, सिनेमांत त्या दिसल्या आहेत. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
