Sanai Chaughade New Entry: ‘सनई चौघडे’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी मालिका आहे. काही महिन्यांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सनई चौघडे मालिकेत दोन कुटुंबे पाहायला मिळतात. एक कुटुंब पमा व सुभाष परब यांचे आहे. जे मध्यमवर्गीय आहे. केटरिंगचा बिझनेस करून तसेच, सुभाषच्या नोकरीवर चालते. त्यांच्याकडे खूप पैसे नाहीत, पण ते स्वाभिमानी आहेत. मुलींची लग्ने व्हावीत, त्यांचा संसार चांगला व्हावा, असे पमा व सुभाषला वाटते. त्यांच्या चारही मुलगी गुणी आहेत. सगळ्यांचे स्वभाव वेगळे आहेत. असावरी, शर्वरी, अनुश्री, मयूरी अशी त्यांच्या मुलीची नावे आहेत. या सगळ्याच मुली त्यांच्या आई-वडिलांचा आदर करतात.
याबरोबरच दुसरे कुटुंब हे खानोलकर कुटुंब आहे. तेजस्विनी खानोलकर ही मोठी उद्योजिका आहे. ती तिच्या जय व गौतममुलांबरोबर तसेच आईबरोबर राहते. त्यांचा मोठा बिझनेस आहे. हा बिझनेस प्रामुख्याने मोठा मुलगा जय खानोलकर सांभाळतो. तो त्याच्या कामाप्रति समर्पित आहे. त्याचे त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. तो त्याच्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो. विशेष म्हणजे,तेजस्विनी खानोलकर म्हणजेच आईच्या शब्दाला मान देतो. त्याला मुली आवडत नाहीत.
दुसरीकडे तिचा लहान मुलगा गौतम मात्र, मध्यमवर्गीय परब कुटुंबातील असावरीच्या प्रेमात पडला आहे. तर असावरीचे दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न ठरले आहे. त्यामुळे गौतमने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. असावरी व गौतम एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सत्य जय व शर्वरीला समजले आहे. तसेच, जयने असावरीचे ठरलेले लग्न मोडावे, असे शर्वरीला सांगितले आहे. त्यामुळे आता मालिकेत काय ट्विस्ट येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
झी मराठीवर ३०० कोटींची मालकीण परत येतेय?
या सगळ्यात मालिकेत नवीन एन्ट्री होणार असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर सनई चौघडे मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की साडी नेसलेली एक महिला आहे. जी जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये आली आहे. ती जयच्या समोरच्या खुर्चीत बसते.
हा व्हिडीओ शेअर करत झी मराठी वाहिनीने लिहिले, “जय खानोलकरच्या भेटीला येत आहे झी मराठीवर गाजलेली व प्रेक्षकांची लाडकी बिझनेस वुमन.” तसेच असेही लिहिले की तुम्ही तिला ओळखलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.
या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी राधिका बनहट्टी असे लिहिले आहे. तर अनेकांनी राधिका मसालेवाले असे लिहिले आहे. तर काहींनी अनिता दाते असे लिहिले आहे. अनेकांनी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका असल्याचे लिहिले आहे. तर काहींनी ३०० कोटींची मालकीण अशाही कमेंट केल्या आहेत.





आता नेटकऱ्यांच्या म्हणण्यांनुसार माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेली राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका २०१६ ला प्रदर्शित झाली होती. या मालिकेतील राधिका, गुरू, अथर्व, शनाया, सौमित्र ही आणि इतर सगळीच पात्रे चांगलीच गाजली होती.
आता सनई चौघडे मालिकेत ज्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे, ती अनिता दातेच आहे की इतर कोणी, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
