Sanai Choughade fame Sharvari visits konkan: ‘सनई चौघडे’ या मालिकेतील परब कुटुंब हे कोकणातील असल्याचे पाहायला मिळते. आता परब कुटुंब खानोलकर कुटुंबातील सदस्यांसह गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणार आहे. त्याचे व्हिडीओ, फोटो कलाकार सोशल मीडियावर शेअर करत आहे. तसेच, कोकणात जाण्याचा अनुभवही सांगत आहेत.

कोकणात पोहोचल्यानंतर ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी काय म्हणाली?

आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणजे मालिकेतील शर्वरी ती कोकणात गेल्याचे सांगत आहे, तसेच तिथला आजूबाजूचा परिसर दाखवत आहे.

व्हिडीओमध्ये शर्वरी म्हणते, “मी गावी आली आहे. तुम्ही बघत असाल की इथे किती हिरवळ आहे. इथे खूप शांत वाटतं. मला नाही वाटत की शहरामध्ये आपल्याला कुठे अशी शांतता मिळेल. गावी गणपतीच्या सुट्ट्यांसाठी येणं, कमाल आहे. असं वाटतंय की मी जवळजवळ स्वर्गात आली आहे.”

पुढे ती एक घर दाखवत म्हणते, “हे आमचं गावचं परबांचं घर आहे. येवा कोकण आपलंच असा.” त्यानंतर ती एका आजींकडे जाते आणि म्हणते, “ही आमची आजी.” आजींना विचारते, “आजी कशी आहेस?” त्यावर आजी म्हणतात, “बरी आहे.” त्यानंतर शर्वरी आजींच्या पाया पडते.

व्हिडीओमध्ये पुढे शर्वरी मांजरांच्या पिल्लांबरोबर खेळत असल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओच्या शेवटी अंधुक प्रकाशात तुळस दिसते. तसेच, शेवटी आमच्या गावचो गणपती असेही लिहिल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये हिरवागार निसर्ग, ग्रामीण जीवन यांची झलक पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत झी मराठीने लिहिले, “आपली टकाटक शरु पोहोचली आहे कोकणात. तुम्ही येताय ना?”

नेटकरी काय म्हणाले?

आता झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “कोकणचा रुबाब भारी आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “जवळजवळ नाही, तुम्ही स्वर्गातच आला आहात”, आणखी एकाने लिहिले, “मलाही कोकण खूप आवडतं”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता सनई चौघडेमधील कोकणातील एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.