Paaru Fame Actress : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने अनेक इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे भारतात देखील घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वी अनेक हॉटेल्स सुद्धा गॅस टंचाईमुळे बंद झाल्याचं पाहायला मिळालं. आता हळुहळू परिस्थिती मार्गावर येत असली तरीही सरकारने नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
झी मराठीची ‘पारू’ मालिका घराघरांत लोकप्रिय होती. या मालिकेने फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांचा अचानक निरोप घेतला. यामध्ये अभिनेत्री संजना काळे ‘प्रिया’ ही भूमिका साकारत होती. आता मालिका संपल्यावर संजना Camping साठी एका खास जागी पोहोचली आहे.
संजना निसर्गरम्य वातावरणात Camping साठी गेली आहे. जंगलात एका बाजूला गाडी पार्क करून, अभिनेत्री गरमागरम मॅगी बनवत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. अन्य काही फोटोंमध्ये संजना मॅगीचा आस्वाद घेताना दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
छोटा सिलिंडर आणि शेगडीचा वापर करून संजनाने जंगलात मॅगी बनवली आहे. नेटकऱ्यांनी तिचा हाच फोटो पाहून यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने तिला विचारलं, “तो सिलिंडर कुठे मिळतोय?” यावर अभिनेत्रीने, “तुमच्याकडेच असू शकतो” असं उत्तर दिलंय.
“गॅस सिलिंडर चोरी होईल सांभाळून”, “गॅस कुठून आणला?”, “गॅस मिळाला का तुम्हाला?”, “सिलिंडर कसा मिळाला मॅडम” अशा भन्नाट कमेंट्स संजनाने शेअर केलेल्या या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, संजना ‘पारू’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. १० फेब्रुवारी २०२६ रोजी अचानक या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या सिरियलचा अंतिम भाग सुद्धा प्रसारित झालेला नाहीये. त्यामुळे या मालिकेचं अचानक निरोप घेणं चाहत्यांसाठी सुद्धा धक्कादायक होतं.
