Sankarshan Karhade AI Retro Look: कलाकार अनेक सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करतात. सध्या इन्स्टाग्रामवर ८० च्या दशकातील AI रेट्रो लूक सर्व जण शेअर करीत आहेत. आता लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेदेखील या ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे.

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. विविध लूकमधील त्याचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये जॅकेट, केसांची वेगळी स्टाईल, हातात बंदूक अशा विविध गोष्टींनुसार कपड्यांची वेगवेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचा ८० च्या दशकातील AI रेट्रो लूक व्हायरल

हे फोटो शेअर करताना त्याने लिहिलेली कॅप्शन सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. त्याने लिहिले, “या ट्रेंडमधील सगळ्यात आवडलेली गोष्ट ही आहे की, डोक्यावर भरपूर केस दिलेत.”

संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “जगात जर्मनी आणि भारतात परभणी. ८० च्या जमान्यात आमचा संकर्षण भारी.” दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप सुंदर दिसत आहे.” आणखी एकाने लिहिले, “संकर्षणसर, तुम्ही अगदी गोविंदासारखे दिसत आहात. हीरो नंबर १.” एकाने लिहिले, “पहिले तीन फोटो पाहून मला शाहरुख खानची आठवण आली.”

एकाने लिहिले, “आधी गोविंदासारखा मिश्किल खट्याळ भाव, नंतर अमोल पालेकरसारखा निरागस लूक. कमाल”, आणखी एकाने लिहिले, “गोविंदासारखा दिसत आहेस.” एकाने लिहिले, “एकदम गोविंदासारखा दिसतोय.” दुसऱ्या एकाने लिहिले, “दादा, खूप हँडसम दिसत आहेस.” एकाने चाहत्याने लिहिले, “तुम्ही जसे आहात, तसेच आवडता आम्हाला”, एकाने लिहिले, “एकच नंबर”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

संकर्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. विविध पोस्ट शेअर करीत तो त्याचे कधी अनुभव सांगतो, तर कधी आठवणी शेअर करतो. तसेच, तो नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.