Premium

वडिलांचा विरोध पत्करून निशी मुंबईला जाणार का? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार रंजक वळण, पाहा प्रोमो

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार नवीन ट्विस्ट, प्रोमो आला समोर…

sara kahi tichyasathi marathi serial upcoming new twist
सारं काही तिच्यासाठी

‘झी मराठी’वरच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत निशी बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबईला कशी जाणार? या कथानकाचा सीक्वेन्स सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रघुनाथरावांनी म्हणजेच निशीच्या वडिलांनी तिला काही अटींसह कॉलेजला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कॉलेजला जाण्याची मुख्य लढाई निशीने जिंकलेली आहे. पण, बाबांनी दिलेल्या अटींमुळे निशी बॅडमिंटन खेळ्यांचे स्वप्न विसरून जाण्याचा विचार करते. निशीने आपली स्वप्न डावलून आयुष्य जगणं हे नीरजला अजिबात मान्य नसतं. त्यामुळे तो बॅडमिंटन खेळण्यासाठी निशीची समजूत काढण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करत असतो.

हेही वाचा : पियुष रानडेशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? सुरुची अडारकर म्हणाली, “तो माणूस म्हणून…”

निशी काही केल्या नीरजचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नसते. शेवटी तिची समजूत काढण्यासाठी नीरज थेट तिच्या घरी पोहोचतो. लवकरच मुंबईला ट्रेनिंग कॅम्प होणार आहे आणि तुझ्या भविष्यासाठी ही सुवर्णसंधी आहे जी गमवून चालणार नाही. अशी माहिती तो निशीला देतो. अखेर निशीला नीरजच बोलणं पटतं आणि आयुष्यात पहिल्यांदाच ती स्वतःसाठी एक योग्य निर्णय घेण्यास तयार होते.

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने भावाबरोबर केला ‘या’ ट्रेडिंग गाण्यावर डान्स, म्हणाली, “पहिल्यांदाच…”

आता निशी बॅडमिंटन कॅम्पसाठी मुंबईला कशी जाणार आणि या निर्णयामध्ये उमा तिची साथ देणार की नाही? याशिवाय मुंबईला जाण्यासाठी ओवी निशीची कशी मदत करेल का? या गोष्टींचा उलगडा मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये करण्यात येणार आहे. उमा रघुनाथरावांना निशीच्या स्वप्नांचं महत्त्व कशी समजावणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sara kahi tichyasathi marathi serial upcoming new twist how will nishi go to mumbai for her badminton competition sva 00

First published on: 07-12-2023 at 11:50 IST
Next Story
पियुष रानडेशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? सुरुची अडारकर म्हणाली, “तो माणूस म्हणून…”