सावली आपल्या विनम्र स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali) मालिकेतील सावली कितीही संकटे आली तरीही संयमाने त्याला सामोरी जाताना दिसते. कोणत्याही परिस्थितीत तिच्या कुटुंबाला त्रास होऊ नये याची ती काळजी घेताना दिसते. लहान भावाच्या औषधोपचारांसाठी पैसे मिळावेत म्हणून ती भैरवीच्या सांगण्यानुसार तिची मुलगी तारासाठी गाताना दिसते. भैरवीने कितीही अपमान केला तरी सावली तिचे कर्तव्य निभावण्यापासून मागे हटत नाही. आता अशा या गरीब घरातील, सावळ्या रंगाच्या मुलीचे श्रीमंत असणाऱ्या व सौंदर्याला अतिमहत्त्व असणाऱ्या घरातील सारंगबरोबर लग्न झाले आहे. हे लग्न दोघांच्याही मर्जीविरुद्ध झाले आहे. सारंगचे अस्मीवर प्रेम होते; मात्र जगन्नाथने बदला घेण्यासाठी सावली व सारंगचे लग्न लावून दिले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सावलीला सारंगची काळजी वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सारंगचा जीव संकटात?

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली झोपली आहे. तिला स्वप्नात काही दृश्ये दिसत आहेत. एका लहान मुलाचा ‘आई मला वाचव’, असा आवाज येत आहे. त्याच वेळी सारंगदेखील तिला दिसत आहे. शेवटी तिला सारंग खिडकीजवळ गेला असून, त्याचा तोल गेला, असे दृश्य दिसते आणि ती झोपेतून घाबरत उठते. विठ्ठ्लाच्या मूर्तीकडे पाहत म्हणते, “सारंग सरांना काही होणार तर नाही ना?”, असे म्हणताना दिसत आहे.

zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर करताना, “सावलीला सतत वाटतेय सारंगसरांची काळजी…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत सारंगला अंधाराची भीती वाटत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. अंधारात त्याला असह्य वाटत असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा सावलीने त्याला आधार दिला आहे. एकदा तो नदीत बुडत असताना त्याला वाचवले आहे. मात्र, सारंगला नेहमीच ती अस्मी वाटत असल्याचे पाहायला मिळाले. आता नेमके असे काय घडले होते की, ज्यामुळे सारंगला अंधाराची भीती वाटते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो

आता सावलीची भीती खरी ठरणार का, सारंगचा जीव संकटात सापडणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

Story img Loader