‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ हे पर्व काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वाने आणि या पर्वातील सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आढळत स्थान निर्माण केलं. या पर्वात आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन टॉप ५ स्पर्धक ठरले. तर आज हे पाचही जण लोकप्रिय गायक बनले आहेत. त्यांच्या कामाबरोबरच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील चांगलीच झेप घेत आहेत. आता गायिका मुग्धा वैशंपायन हिने एक पोस्ट शेअर करत तिने केलेली सुवर्ण कामगिरी सर्वांशी शेअर केली.

मुग्धा गेली अनेक वर्षं गाण्याचे विविध कार्यक्रम करत आहे. हे सगळं सांभाळतानाच तिने तिच्या शिक्षणाकडेही अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. अभ्यास, गाण्याचे कार्यक्रम, गाण्याचा रियाज हे सगळं एकत्रित उत्तमरीत्या सांभाळत तिने M.A in Music ही पदवी उत्तम गुणांनी मिळवली आहे. याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आणि तिच्या मार्गदर्शकांचे आभार मानण्यासाठी तिने खास पोस्ट शेअर केली.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

आणखी वाचा : ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ फेम मुग्धा वैशंपायनने घेतली नवी कार

मुग्धाने तिच्या गुरु विदुषी शुभदा पराडकर आणि तिच्या एम.एच्या गाईड डॉ. अनाया थत्ते यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “मला हे तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की मी मुंबई युनिव्हर्सिटीतून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात गोल्ड मेडल आणि ८४% मिळवत मास्टर डिग्री यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. याचं संपूर्ण श्रेय माझ्या गुरु विदुषी शुभदा पराडकर यांना जातं. याचबरोबर मला मार्गदर्शन केल्याबद्दल माझ्या एम.एच्या गाईड डॉक्टर अनया थत्ते यांचे मनापासून आभार.”

हेही वाचा : ती सध्या काय करते? ‘लिटिल चॅम्प’मधील मुग्धा वैशंपायन आठवते का?

आता मुग्धाची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून यावर कमेंट करत सर्वजण तिचं अभिनंदन करत आहेत आणि याचबरोबर तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.