scorecardresearch

Premium

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री सध्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम

Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeekshaa Tawde
'ही' मराठमोळी अभिनेत्री सध्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम

मराठी मनोरंजनसृष्टीत असे बरेच कलाकार मंडळी आहेत, जे आपली नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपासत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी विविध क्षेत्रात काम करून झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आज असेच कलाकार मंडळी मराठी मनोरंजनसृष्टीत आघाडीवर आहेत. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.

हेही वाचा – ‘तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?’; गौतमी पाटीलनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

Bollywood actress nushrratt bharuccha stranded in israel
इस्रायलमध्ये अडकली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री; संपर्क होईना, चिंता वाढली…
tharala tar mag fame actress jui gadkari
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो
marathi actress Megha Dhade
“…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा
nisha rawal
“मला आत्महत्या करावीशी वाटत होती”, लोकप्रिय अभिनेत्रीने मांडली व्यथा, म्हणाली, “माझी…”

ही मराठमोळी अभिनेत्री सध्या मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच सध्या तिची मालिकाही चांगलीच गाजत आहे. या व्हायरल फोटोमधली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तितीक्षा तावडे आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर

तितीक्षाने नुकताच तिचा हा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोवर तिनं “माझा एक जुना फोटो दाखवू” असं लिहीलं आहे. तितीक्षाचा हा पहिल्या नोकरीतला फोटो आहे. मॅकडोनाल्डमध्ये तितीक्षाने पहिली नोकरी केली होती, याची माहिती तिनं फोटो शेअर करत दिली आहे.

हेही वाचा – Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…”

या फोटोवर बऱ्याच कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. तसेच तितीक्षाच्या चाहत्यांना हा फोटो पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका चाहत्यानं तिच्या फोटो खाली लिहीलं आहे की, ‘खरंच ही तू आहेस. अजिबात विश्वात बसतं नाहीये. किती बदल झाला आहे…पण गोड आहेस.’ तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘गुब गुबी’. तसेच तिसऱ्या चाहत्यानं विचारलं आहे की, ‘तू हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं का?’

दरम्यान, तितीक्षा सध्या ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीही तिताक्षा काही मालिका आणि चित्रपटात झळकली आहे. तसेच मराठीबरोबर तिनं हिंदीतही काम केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame titeekshaa tawde share first job photo pps

First published on: 24-09-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×