मालिका किंवा चित्रपट पाहताना आपल्याला अनेकदा पात्रे मनातल्या मनात विचार करताना पाहायला मिळतात. मात्र, त्यांनी मनात केलेले विचार आपल्याला ऐकायला येतात. हे कसे होत असेल, असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडताना दिसतो. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा अनेक मालिका व चित्रपटांचे शूटिंग कसे होत असते, शूटिंगदरम्यान काय गमती-जमती घडतात, कलाकारांची मजा-मस्ती, एखादे शूटिंग होत असताना काय गोष्टी केल्या जातात हे पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अशा पोस्टमधून मिळताना दिसतात. आता असाच एक शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या शूटिंगचा व्हिडीओ

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'(Satvya Mulichi Satvi Mulgi) या मालिकेत रीमाची भूमिका साकारणारी बालकलाकार वीरा नेवालेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनातील बोललेले प्रेक्षकांना कसे ऐकायला मिळते, हे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मालिकेतील रीमाचे काही डायलॉग्ज रेकॉर्ड केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती म्हणते, “खरंच ही माझी आई नाहीये का? मग माझी आई कोण होती? ती कशी दिसत असेल? आईचा फोटो बघू का एकदा? पण, मग त्यासाठी आईचा मोबाईल काकाआजोबांना द्यावा लागेल.” याच व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, रीमा रात्रीच्या वेळी विचार करत आहे. त्यावेळी आधी जे डायलॉग्ज रेकॉर्ड केले होते, ते ऐकायला मिळत आहेत. अशा प्रकारे जे मनात विचार करण्याबाबतचे संवाद असतात, ते दाखवले जात आहेत.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेबद्दल बोलायचे, तर काही दिवसांपूर्वी केतकीचा नवरा केदारची एन्ट्री झाली आहे. केदार त्याच्याच कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी परत आला आहे. केतकीला मात्र अनेक वर्षांनंतर तिचा नवरा घरी आल्याने आनंद झाला आहे. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होत असल्याचे दिसते. मात्र, केदारचा खरा चेहरा नेत्रा, मैथिली व नेत्राचा सासरा यांना माहीत आहे. नेत्राला दोन मुली आहेत. एकीचे नाव ईशा व दुसरीचे नाव रीमा आहे. केदार रीमाच्या मनात तिच्या आईविषयी वाईट गोष्ट पेरत असल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे तो अद्वैतच्या आयुष्यात मेघनाला आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हेही वाचा: “मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”

आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पुढे काय होणार, केदारच्या योजना यशस्वी होणार का, घर वाचवण्याच्या नेत्राच्या प्रयत्नांना यश मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader