Savalyachi Janu Savali Fame Actress : ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. यामधील सावली, सारंग, भैरवी, ऐश्वर्या असे सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील अशाच एका अभिनेत्रीने प्रेक्षकांबरोबर नवीन बिझनेस सुरू केल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत भैरवीच्या मुलीची म्हणजेच ‘तारा’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री दळवीने आपल्या बहिणीच्या साथीने कुकीजचा बिझनेस सुरू केला आहे. यानिमित्ताने खवय्यांना घरगुती कुकीजचा आस्वाद घेणार आहे.
भाग्यश्री ही पोस्ट शेअर करत लिहिते, “आता आमच्या कुकीज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत… या कुकीज आम्ही अगदी मनापासून बनवतोय. लहानातील लहान प्रत्येक व्यवसाय सुरू करण्यामागे एक कथा असते… आमच्या या नव्या प्रवासाचा एक भाग होऊन कायम आम्हाला सपोर्ट करा.”
भाग्यश्रीने शेअर केलेल्या पोस्टवर सावलीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राप्ती रेडकरने खास कमेंट केली आहे. ती म्हणाली, “तुम्हा बहिणींचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. फायनली तुम्ही या बिझनेसची सुरुवात केलीये”, अभिनेत्री मेघा धाडे सांगते, “वॉव आमचे आवडते कुकीज आता सर्वांना खायला मिळतील.” याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा भाग्यश्री व तिच्या बहिणीला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत भाग्यश्री दळवीसह प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, वीणा जगताप या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही मालिका रोज सायंकाळी साडेसहा वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.

