Prapti Redkar on Phiri Phiri Nach Song: अभिनेत्री प्राप्ती रेडकर डान्स व्हिडीओच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. विविध ट्रे़डिंग गाण्यांवर ती डान्स करते. अनेकदा ती तिच्या सहकलाकारांबरोबरदेखील व्हिडीओ पोस्ट करते. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या व्हिडीओंना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरी फिरी नाच पोरा फिरी फिरी नाच हे अहिराणी गाणे ट्रेंड होत आहे. अनेकांनी या गाण्यावर ठेका धरला आहे. यामध्ये अनेक कलाकारांचादेखील समावेश आहे. आता अभिनेत्री प्राप्ती रेडकरनेदेखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

प्राप्ती रेडकरचा कमाल डान्स

प्राप्ती रेडकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की प्राप्ती ‘फिरी फिरी नाच पोरा फिरी फिरी नाच’ या गाण्यावर सुंदर डान्स करते. गाण्याच्या बोलानुसार तिची प्रत्येक डान्स स्टेप लक्ष वेधून घेत आहे. याबरोबरच, तिच्या चेहऱ्यावरील हावभावही लक्ष वेधून घेत आहेत.

प्राप्तीने लाल रंगाचा ड्रेस घातला असून तिने केस मोकळे सोडले असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की ट्रेंडने मला हे करायला लावले आहे.

नेटकऱ्यांनी केले प्राप्ती रेडकरचे कौतुक

प्राप्तीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सुंदर”, दुसऱ्या एकाने लिहिले, “मस्त डान्स”, आणखी एकाने लिहिले, “खूप खूप छान आणि सुंदर डान्स केला”, एकाने लिहिले, “सर्वोत्तम परफॉर्मन्स”, एकाने लिहिले, “आमच्या खानदेशात कधीतरी ये”, आणखी एकाने लिहिले, “तू छान नाचतेस”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. याबरोबरच, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

चाहत्यांनीच तर कलाकारांनी देखील कमेंट्स करत प्राप्तीचे कौतुक केले आहे. यामध्ये किरण गायकवाड, पूर्वा शिंदे, पूर्णिमा डे यांचा समावेश आहे.

दरम्यान, प्राप्ती रेडकर सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने सावली ही भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे.