Purva Shinde on Sulekha Talwalkar: अभिनेत्री पूर्वा शिंदेने तिच्या खलनायिकेच्या भूमिकांतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत तिने जयडी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर पारू या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. या मालिकेतील दिशा या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

सध्या ती ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोनिका ही भूमिका साकारत आहे. त्याबरोबरच,सन मराठी वाहिनीवरील इन्स्पेक्टर मंजू या मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

पूर्वा शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करीत असते. कधी डान्सचे व्हिडीओ, कधी तिचे विविध लूक, तर कधी ती विनोदी रील्स शेअर करत असते. अनेकदा ती सहकलाकारांबरोबरदेखील व्हिडीओ शेअर करते.

पूर्वाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री सुलेखा तळवलकर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या दोघी एकमेकांशी गप्पा मारताना, एकमेकांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. तसेच, त्या अधूनमधून हसत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.

“काही मैत्री…”

या व्हिडीओवर पूर्वाने लिहिले आहे, “काही मैत्री या वयानुसार होत नाहीत, तर त्या नशिबात लिहिलेल्या असतात.” तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “एक अनुभव घेऊन येते, तर एक गोंधळ घेऊन येते; पण तरीही ही मैत्री झाली आहे आणि ती टिकून आहे.” पुढे तिने सुलेखा तळवलकर यांना टॅग करीत असेही लिहिले, “मी तुम्हाला भेटले, याचा मला खूप आनंद आहे. लव्ह यू.”

https://www.instagram.com/reel/DbasZo0xvI6/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. प्राप्ती रेडकरने लिहिले, “क्यूटी” आणि त्यावर पूर्वाने थँक्यू गोडुली, असे म्हणत रिप्लाय दिला आहे. तर सुलेखा तळवलकर यांनीही कमेंट केल्याचे दिसत आहे. तर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, सुलेखा तळवलकर यांनी सावळ्याची जणू सावली या मालिकेत तिलोत्तमा ही भूमिका साकारली आहे. या मालिकेत सतत विविध ट्विस्ट येत असतात. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.