Prapti Redkar shares Dance Video: सोशल मीडियावर सतत विविध ट्रेंड येत असतात. अनेक गाणी व्हायरल होतात, काही डायलॉग लोकप्रिय ठरतात. काही डान्स स्टेप्स ट्रेंड होतात. यावर अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आणि सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण व्हिडीओ शेअर करत असतात. या रील्स व्हायरल होतात. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांचे कौतुक होते. काही वेळा ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो.

अनेक कलाकारही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गाण्यांवर, ट्रेंडिंग ऑडिओवर व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. आता सावळ्याची जणू सावली मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री प्राप्ती रेडकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ फेम सावलीचा ‘लाल लाल कलरची बांगडी…’ गाण्यावर डान्स

प्राप्तीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती संजू राठोडच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या लाल लाल कलरची बांगडी या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तिच्या मागे स्विमिंग पूल दिसत असून. पाठीमागे निसर्ग पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना प्राप्तीने लिहिले की माझ्या सोशल मीडियाच्या अल्गोरिदमने मला हे करायला लावले. प्राप्तीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “क्यूट”, दुसऱ्या एकाने लिहिले, “किती गोड”, आणखी एकाने लिहिले, “खूप सुंदर”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी प्राप्तीचे कौतुक केले आहे.

सध्या प्राप्ती सावळ्याची जणू सावली मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने सावली ही भूमिका साकारली आहे. शांत, प्रेमळ तितकीच खंबीर सावली प्रेक्षकांची लाडकी आहे. सावली व सारंगची यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. आता अबीरची आई म्हणून ती सर्वांची मने जिंकत आहे. गैरसमजांमुळे सावली व सारंग यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. आता ते पुन्हा कधी एकत्र येणार याची प्रेक्षक वाटत पाहत आहे.

राजकुमार, मोनिका सतत कट कारस्थान करत असल्याचे पाहायला मिळत असून तिलोत्तमाच्या मनात अजूनही सावलीबद्दल राग आहे. सारंग व सावली यांच्यात दुरावा आला असला तरी सारंगच्या मनात सावलीबद्दल अजूनही प्रेम आहे. आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.