‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले सदस्य जितके चर्चेत आहेत. तितकेच इतर पर्वातील सदस्यांची देखील चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेले सदस्य आता विविध मालिका, चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’तील दोन अभिनेत्री सध्या एका मालिकेत काम करताना दिसत आहेत, त्या म्हणजे मेघा धाडे आणि वीणा जगताप.

दोन महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मेघा धाडे आणि वीणा जगताप पाहायला मिळत आहे. या मालिकेत मेघाने भैरवी वझे आणि वीणाने ऐश्वर्या मेहेंदळी साकारली आहे. त्यामुळे सध्या दोघींमधील मैत्रीणचं नातं आणखीन दृढ झालेलं पाहायला मिळत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास

काही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्ताने वीणाने मेघाला खास गिफ्ट दिलं होतं. वीणाने मेघाला पैजण दिले होते. त्यानंतर आता मेघाने सुद्धा वीणाला सुंदर गिफ्ट दिलं आहे. याचा व्हिडीओ वीणाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मेघाचे आभार मानत वीणा म्हणाली, “नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे कसे आहात? सकाळी हा व्हिडीओ बनवते. याचं कारण असं आहे, रोज मी सकाळी मेकअप करते. तेव्हा मी विचार करते, मला मेकअप व्हॅनिटी घ्यायची आहे. वेळ मिळत नव्हता. ज्या दिवशी सुट्टी असायची, तेव्हा कुठून घेऊ? कुठे छान मिळेल? ऑनलाईन बघत होते. पण कळतंच नव्हतं आणि मला मेघा धाडेने दिवाळीनिमित्ताने एक सुंदर मेकअप व्हॅनिटी गिफ्ट केली. जी मला काल मिळाली आहे. बघा…”

“म्हणजे मी इतके दिवस विचार करत होते. घेऊ, घेऊ…पण मी म्हटल्याप्रमाणे काही सुचत नव्हतं आणि मला दिवाळी गिफ्ट काल मिळालंय. मेघा मला घरी गिफ्ट देऊन गेली. मेघा खूप खूप धन्यवाद. आम्ही काल व्हिडीओ केले नाहीत. पण मी आज व्हिडीओ केलाय. मेघा थँक्यू सो मच. तू माझी मोठी समस्या दूर केलीस…एवढं सगळं सामान एका व्हॅनिटीमध्ये जाणार. दिवाळीच्या या सुंदर गिफ्टसाठी थँक्यू सो मच मेघा,” असं वीणा म्हणाली.

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

हेही वाचा – ७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”

दरम्यान, वीणा जगतापचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर मेघा धाडे, तितीक्षा तावडेने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच चाहत्यांनी देखील मेघाने दिलेल्या गिफ्टचं कौतुक केलं आहे.

Story img Loader