scorecardresearch

“मी ज्या मुलांना प्रपोज केलं त्यांनी…” सायली संजीवने प्रेमाबद्दल केला होता मोठा खुलासा

तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील प्रेमाचा खुलासा केला होता.

sayali sanjeev

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सायली संजीव. आज ती तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपट, मालिका या दोन्ही माध्यमात काम करून आपल्या अभिनयचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सायली संजीवचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. सायलीच्या कामबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा रंगलेल्या दिसतात. अशातच एका मुलाखतीत तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील प्रेमाचा खुलासा केला होता.

काही महिन्यांपूर्वी सायलीने सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने भरभरून गप्पा मारल्या. तिने तिच्या आयुष्याबद्दल कोणालाही माहीत नसलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या. या संवादादारम्यान एका प्रश्नाचं उत्तर देताना तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील प्रेमाबद्दल सांगितलं होतं.

आणखी वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

ती म्हणाली होती, “मी बऱ्यापैकी स्पष्टवक्ती आहे. माझ्या जे मनात असेल ते मी बोलून मोकळी होते आणि आपल्याला जर एखादा मुलगा आवडत असेल तर आपण त्याला प्रपोज करावं. पण कॉलेजमध्ये असताना मी ज्या मुलांना प्रपोज केलं, त्यापैकी एकाही मुलाने मला होकार दिला नाही.” सायलीच्या या उत्तराने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच फार आश्चर्य वाटलं होतं. पुढे सायली म्हणाली होती की, “आज हा एपिसोड ते बघत असतील. त्यांना हा प्रसंग बरोबर आठवेल.” तिने सांगितलेला हा किस्सा चांगलाच गाजला होता.

हेही वाचा : भान हरपून सायली संजीवने कॉफी शॉपमध्येच केलं असं काही की…; फोटो व्हायरल

दरम्यान सायली संजीव काही महिन्यांपूर्वी ‘पैठणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर आता यावर्षीही ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच २०२१ साली प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड गाजलेल्या तिच्या ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. ‘झिम्मा २’ हा चित्रपट यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 12:56 IST