Ujwala Jog Swimming Video: कलाकार विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कलाकारांच्या काही भूमिका दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमातून कलाकार विविध छटा असलेल्या भूमिका साकारत असतात.

ज्येष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

पावनखिंड, हॅशटॅग प्रेम, झेंडा, इश्श्य, मी आणि यू अशा अनेक चित्रपटांत उज्ज्वला जोग यांनी काम केले आहे. या गोजिरवाण्या घरात, उंच माझा झोका, तुझं माझं ब्रेकअप, ह.म.बने तु.म. बने, तू तेव्हा तशी, कन्यादान अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग यांची ऊर्जा पाहून व्हाल थक्क

अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. त्या विविध फोटो, व्हिडीओ शेअर करीत लक्ष वेधून घेतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या पोहत असल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांच्या चेहऱ्यावर हसूही पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना उज्ज्वला जोग यांनी, आवडती गोष्ट, अशी कॅप्शन दिली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांसह कलाकारांनीदेखील कमेंट्स करीत उज्ज्वला जोग यांचे कौतुक केले आहे.

कलाकार व चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री रेशमने लिहिले, “संपूर्ण वेळ हसत आहेस. खूप गोड”, विशाखा सुभेदारने लिहिले, “लाली माँ, मस्तच”, स्वाती चिटणीस यांनी लिहिले, “वाह”, अभिषेक राहळकरने लिहिले, “कमाल”, किशोरी शहाणेंनी लिहिले, “वाह”, सुकन्या मोनेंनी लिहिले, “वाह! किती मस्त”, अशा कमेंट्स करीत कलाकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.

कलाकारांबरोबर अनेक नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह! खूप छान. अशाच चिरतरुण राहा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही प्रेरणास्थान आहात”, एकाने लिहिले, “एक नंबर लाली मां; वय फक्त आकडा आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “कमाल, खरंच कमाल”, एकाने लिहिले, “खूप प्रेरणादायी”, एकाने लिहिले, “खूप छान”, दुसऱ्या एकाने लिहिले, “वाह” अशा कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी उज्ज्वला जोग यांचे कौतुक केले आहे; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

उज्ज्वला जोग अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करतात. चाहते त्यांच्या फोटो, व्हिडीओंना उत्तम प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहेत