scorecardresearch

Premium

“त्यांनी मला फोन केला अन्…”, शैलेश लोढांचा असित मोदींबद्दल मोठा दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांप्रमाणे…”

शैलेश लोढांनी सांगितलं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडण्याचं खरं कारण, निर्मात्यांबद्दल केले खुलासे

Shailesh Lodha makes shocking claims against TMKOC producer Asit Modi
शैलेश लोढा असित मोदींबद्दल काय म्हणाले? (फोटो – इन्स्टाग्राम)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडली. त्यांनी २०२२ मध्ये मालिका सोडली आणि त्यानंतर निर्मात्यांवर थकबाकीवरून गंभीर आरोप केले. त्यानंतर आता त्यांनी एका मुलाखतीत शो सोडण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली, याचा खुलासा केला आहे.

‘लल्लनटॉप’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शैलेश लोढा यांनी पहिल्यांदाच हा शो का सोडला याबद्दल खुलासा केला. शैलेश लोढा यांना सब टीव्हीवरील ‘गुड नाईट इंडिया’ या स्टँड-अप शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा असित मोदींनी आपल्याला वाईट वागणूक दिली आणि त्या शोचा भाग असल्याबद्दल अपमानित केले असं शैलेश म्हणाले. इतकंच नाही तर एकदा शोमध्ये असित मोदींनी कलाकारांना नोकरांप्रमाणे अपमानास्पद वागणूक दिली होती, असा दावाही शैलेश यांनी केला.

ashok saraf
Video “पाहुण्यांना बसायला सांगायची पद्धत नाही का?” मराठी अभिनेत्याला दिलेल्या वागणुकीवरुन अशोक सराफांवर नेटकरी नाराज
kamal-haasan-suicidal thoughts
कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा
actor Prakash Raj complaint against YouTube channel in Bengaluru over death threats
सनातन धर्माबद्दलच्या विधानानंतर प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी, एका यूट्यूब चॅनलवर गुन्हा दाखल
jitendra-awhad-jawan
जितेंद्र आव्हाडांसह बघा शाहरुखचा ‘जवान’; मुंब्रा व कळव्यातील तरूणांना मोफत तिकिटांचे वाटप

Farrey Teaser: सलमान खानने भाची अलिजेहला बॉलीवूडमध्ये केलं लाँच, ‘फर्रे’चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

दुसऱ्या शोचा उल्लेख करत शैलेश म्हणाले, “मी त्यासाठी शूट केले आणि तिथे एक कविताही पाठ केली. टेलिकास्टच्या एक दिवस आधी, तारक मेहताच्या निर्मात्यांनी मला फोन केला आणि विचारलं की मी त्या शोमध्ये कसा जाऊ शकतो. त्यांनी वापरलेली भाषा सभ्य नव्हती, त्यामुळे मला राग आला. ते माझ्याशी ज्या प्रकारे बोलत होते ते मला सहन होत नव्हतं. एक शो फक्त एका व्यक्तीने नाही तर अनेक लोक एकत्र येऊन बनवला जातो. मी त्यांना १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मेल केला की मला शो सुरू ठेवायला जमणार नाही. पण आपले पात्र बदलायला वेळ लागू शकतो, ही निर्मात्यांची अडचण समजून घेत मी शूटिंगसाठी जात राहिलो.”

Photos: भरजरी लेहेंगा, ओढणीवर राघवरावांचं नाव अन्…; परिणीती चोप्राच्या लग्नातील फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्याने पुढे असा दावा केला की निर्मात्याने त्यांचे पैसे दिले नव्हते. ते पैसे न देऊन मला दबावात आणण्याचा प्रयत्न करत होते. “असित मोदींनी मला एका करारावर सही करायला सांगितलं होतं, ज्यामुळे माझे अधिकार कमी झाले असते. पण मी त्यांना भेटण्यास उत्सुक नव्हतो. त्यानंतर ५ एप्रिल रोजी मी आणखी एक मेल पाठवला आणि सांगितलं की माझा चांगुलपणा म्हणून शूटिंग करत आहे परंतु ते मी पुढे चालू ठेवणार नाही,” असं त्यांनी सांगितलं.

शैलेश पुढे म्हणाले, “मी सोशल मीडियावर बोलण्यापूर्वी किंवा मीडियाशी बोलण्यापूर्वी त्यांची परवानगी का घ्यावी? हे माझे मूलभूत अधिकार आहेत आणि मी शो सोडल्यानंतर त्यांचं का ऐकू? हा मुद्दा कधीच पैसे किंवा पेमेंटचा नव्हता तर ते अपमानास्पद भाषेत कसे बोलले याबद्दल होता. त्यामुळे मला न्यायालयात जावे लागले आणि तोडगा निघाला.”

दरम्यान, थकबाकीवरून झालेल्या वादानंतर असित मोदींनी प्रतिक्रिया दिली होती. असित मोदींनी त्यांच्या ट्विटरवर लिहिलं होतं, “गोष्टी रेकॉर्डवर ठेवण्यासाठी शैलेश लोढा यांनी त्यांच्या रिलिव्हींग औपचारिकता पूर्ण करण्यास आणि एक्झिट कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला होता. हे प्रलंबित असल्याने आम्ही त्यांची थकबाकी देऊ शकत नव्हतो. नीला फिल्म्सने त्यांचे इनव्हॉइस मिळताच त्यांच्या थकबाकीवर टीडीएस कापून भरला होता. आम्ही त्यांच्या थकबाकीसाठी डिमांड ड्राफ्ट देखील तयार केला होता.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shailesh lodha shocking claims against tmkoc producer asit modi he called everyone his servant hrc

First published on: 26-09-2023 at 10:09 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×