scorecardresearch

दुसरं लग्न करणार शालीन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी, बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा

दलजीतने बॉयफ्रेंड निखिल पटेलशी गुपचूप साखरपुडाही उरकला आहे

Dalljiet Kaur, Dalljiet Kaur second marriage, Bigg Boss 16, Shalin Bhanot, Dalljiet Kaur, Nikhil Patel, Bigg Boss 16 in news, Bigg Boss 16 latest news, Bigg Boss 16 updates, शालीन भनोत, दलजीत कौर, बिग बॉस 16
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस १६ चा स्पर्धक शालीन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर आता दुसरं लग्न करणार आहे. अभिनेत्री स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. दलजीत कौर लवकरच लंडनमधील बिझनेसमन निखिल पटेलशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांचं लग्न मार्च महिन्यात होणार असून त्यानंतर ती पतीबरोबर परदेशात स्थायिक होणार आहे. एवढंच नाही तर दलजीतने बॉयफ्रेंड निखिल पटेलशी गुपचूप साखरपुडाही उरकला आहे.

शालीन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर ‘इ-टाइम्स’शी बोलताना लग्नाच्या प्लानबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “लग्न मार्च महिन्यात आहे आणि मी माझा ९ वर्षांचा मुलगा जेडनबरोबर लंडनला स्थायिक होणार आहे. काही वर्षांसाठी आम्ही नैरोबी (आफ्रीका) मध्ये राहणार आहोत. कारण निखिल सध्या तिथे काम करत आहे. त्यानंतर आम्ही लंडनला जाणार आहोत. जिथे निखिलचा जन्म झाला आणि तो त्याच ठिकाणी लहानाचा मोठा झालाय.”

दलजीत पुढे म्हणाली, “मी निखिलला पहिल्यांदा एका मित्राच्या पार्टीमध्ये दुबईमध्ये भेटले होते. त्यावेळी मी माझ्या मुलाबद्दल आणि तो त्याच्या मुलींबद्दल बोलत होता. त्याची मोठी मुलगी आरियाना १३ वर्षांची आहेत कर दुसरी मुलगी आनिका ८ वर्षांची आहे. निखिलच्या पायांना त्यावेळी निळ्या रंगाची नेलपेंट लावलेली होती. जेव्हा मी त्याला याबाबत विचारलं तेव्हा तो म्हणाला की त्याला दोन मुली आहेत आणि याचा त्याला खूप अभिमान वाटतो. त्यावेळी आमच्यात रोमान्स नव्हता. आम्ही फक्त २ सिंगल पेरेंट्स होतो. आमच्या मुलांनी आमच्यात प्रेम जागवलं. आमच्या लग्नानंतर आनिका तिच्या आईबरोबर आणि आरियाना आमच्याबरोबर राहणार आहे.”

आणखी वाचा- “त्यांच्या नात्याला कोणतंही…” शालिन भानोत-टीना दत्ताच्या नात्यावर अभिनेत्याच्या आईचं स्पष्ट उत्तर

दरम्यान दलजीत कौर आणि अभिनेता शालीन भानोत यांचं लग्न २००९ साली झालं होतं. २०१३ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बरेच वाद होते. या दोघांना ९ वर्षांचा मुलगा आहे. ज्याचं नाव जेडन आहे आणि तो दलजीतबरोबर राहतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 16:26 IST