Shantanu Moghe Fitness & Diet Routine : हल्ली फिटनेस, डाएट रूटीन याबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जातं. फिटनेसबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत असून सर्वत्र याबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. यापैकीच एक माध्यम म्हणजे सोशल मीडिया. यामार्फत डाएट, हेल्थ याबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. आणि सेलिब्रिटींचे डाएट रुटीनबद्दलचे आणि फिटनेस संदर्भातील व्हिडीओसुद्धा यावर व्हायरल होत असतात.

सेलिब्रिटी अनेकदा मुलाखतींमधून ते फिट राहण्यासाठी ते काय करतात, काय खातात किती खातात आणि काय खाणं टाळतात तसेच व्यायाम, योगा या सगळ्याबद्दल बोलत असतात. अशातच आता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता शंतनू मोघेनेसुद्धा फिट राहण्यासाठी तो काय करतो याबद्दल ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. शंतनूने यावेळी फिटनेसचे महत्त्वसुद्धा सांगितलं आहे.

फिट राहण्यासाठी काय करतो शंतनू मोघे?

मुलाखतीत शंतनू फिटनेसबद्दल बोलताना म्हणाला, “महिन्यातील ३० दिवस माझं शूटिंग असतं असं काही नाहीये आणि प्रयोग असतात तेव्हासुद्धा ते दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री असतात. त्यामुळे मला सकाळी व्यायाम करायला वेळ मिळतो. डाएटबद्दल बोलायचं झालं तर डाएट करायला मला थोडं जड जातं. कारण- मला सगळंच खायला आवडतं. पण, हो रात्री जरा कमी खाणं, प्रोटीनवर जास्त भर देणं, नारळाचं पाणी पिणं. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी करणं आणि मी पूर्णपणे शाकाहारी आहे त्यामुळे मला उत्तम जेवण मिळालं की मला आनंद होतो. खरंतर व्यायाम वगैरे हे फार अवघड नाहीये.”

Award Banner

शारीरिक स्वस्थाप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात तर अनेकांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक जण तणावातून जात असतात. यामुळेच हल्ली मानसिक आरोग्याविषयीची जागृकता अधिक वाढली आहे. अशातच आता शंतनू मोघेनंसुद्धा तो त्याच्या मानसिक आरोग्यासाठी काय करतो याबद्दल सांगितलं आहे.

शंतनूला सकारात्मक राहण्यासाठी मानसिक आरोग्याची कशी काळजी घेतो, काही विशेष गोष्टी करतो का? असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो. मी दररोज ओमची साधना करतो. मी दररोज प्राणायाम करतो. कधी कधी शूटिंगमुळे जमत नाही. पण, जमेल तसं करतोच. मी उत्तम पुस्तकं वाचतो. झोपण्याआधी थोडं वाचतो. मी भरपूर खातो. त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी हे सगळं करतो.पण, मला चांगले मित्र आणि उत्तम कुटुंबीय मिळाल्यानं मानसिक आरोग्यासाठी फार काही करावं लागत नाही आणि मी व्यायाम करतो, स्विमिंग करतो.”

पुढे त्याला देवावर विश्वास आहे का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो आहे. मी देवाचं खूप काही करतो असं नाहीये. पण, माझा देवावर १०० टक्के विश्वास आहे. तुम्ही देव म्हणा, नशीब म्हणा किंवा दुसरं काही म्हणा पण एक शक्ती नक्कीच आहे. जी तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी मदत करते. पण, त्यासाठी तुम्हाला स्वत:ला समर्पित करावं लागतं.”