scorecardresearch

…म्हणून ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोवरने जाहिरातीसाठी विराट-अनुष्का दिला नकार

विराट-अनुष्काला अश्नीर ग्रोवरने जाहिरातीसाठी नाकारलं, कारण…

…म्हणून ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोवरने जाहिरातीसाठी विराट-अनुष्का दिला नकार
अश्नीर ग्रोवरने विराट-अनुष्काला नाकारलं. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘शार्क टँक’ शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेला भारत पेचा सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर सध्या चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात अश्नीर ग्रोवर परीक्षक नसला तरी त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. अश्नीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारताचा माजी कर्णधार व स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक किस्सा सांगितला आहे.

अश्नीरने विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून घेण्यासाठी नकार दिला होता. वगेरा वगेरा पॉडकास्टमध्ये अश्नीरने हा किस्सा सांगितला आहे. “मी ब्रोकरबरोबर आयपीएलच्या जाहिरात कराराबाबत चर्चा करत होतो. आयपीएलमधील खेळाडूंच्या जर्सीवर मला जाहिरात द्यायची होती. माझा प्रस्ताव ब्रोकरजवळ मांडताच त्याने मला विराट कोहलीला ब्रॅण्ड अम्बेसिडर बनवण्याचा सल्ला दिला”, असं अश्नीरने सांगितलं.

हेही वाचा>>आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? दुबईतील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

पुढे तो म्हणाला, “विराट कोहलीला मी ब्रॅण्ड अम्बेसिडर बनवण्यासाठी तयार होतो. पण ब्रोकरने त्याची फी सांगितल्यानंतर मी नकार दिला. विराट कोहलीची फी तेव्हा मला फार जास्त वाटली होती”.  विराट कोहलीबरोबर अनुष्का शर्माला घेण्याचा सल्लाही त्याने दिला होता. यावर अश्नीरने त्याला “मला लग्नासाठी लेहेंगा किंवा शेरवानी विकायची नाहीये. मान्यवरने त्यांना घेऊन जाहिरात केली आहे. त्यामुळे मला पुन्हा त्यांना एकत्र घ्यायचं नाही”, असं उत्तर दिलं.

हेही वाचा>> लग्नाला महिना होताच हार्दिक-अक्षया पोहोचले गोव्याला, समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर करत म्हणाले…

विराट कोहलीऐवजी दुसरा कोणताही खेळाडू देण्याचा सल्ला अश्नीरने ब्रोकरकडे मागितला. यावर ब्रोकरने त्याला “विराट कोहलीपुढे कोणीही नाही”, असं उत्तर दिलं. त्यानंतर अश्नीरने त्याला “विराट कोहलीच्या फीच्या अर्ध्या किंमतीत बाकीचे ११ खेळाडू दे”, अशी ऑफर केली. त्यानंतर हाच करार पक्का झाल्याचंही अश्नीरने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 16:45 IST

संबंधित बातम्या