scorecardresearch

Shark Tank India 2 : “मला मिशी असलेली मुलगी म्हणून…” नमिता थापरने शेअर केला बॉडी शेमिंगचा ‘तो’ अनुभव

सर्रास होणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दल नमिता थापर हिने नुकतंच वक्तव्य केलं

Shark Tank India 2 : “मला मिशी असलेली मुलगी म्हणून…” नमिता थापरने शेअर केला बॉडी शेमिंगचा ‘तो’ अनुभव
फोटो : इंडियन एक्सप्रेस

Shark Tank India Season 2 : सोनी टेलिव्हिजनवरील ‘शार्क टँक इंडिया’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. ही संकल्पना प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे. याबरोबरच या कार्यक्रमातील परीक्षक ज्यांना शार्क म्हणूंनही ओळखलं जातं त्यांचीसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. यातील परीक्षक नमिता थापर काही दिवसांपूर्वी ही तिच्या मोलकरणीने केलेल्या पोस्टमुळे चर्चेत होती.

आता नमिता थापर पुन्हा चर्चेत आली आहे. अगदी सर्रास होणाऱ्या बॉडी शेमिंग या प्रकाराबद्दल नमिता थापर हिने नुकतंच वक्तव्य केलं आहे. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये नमिताने याविषयी भाष्य केलं होतं. शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये एका स्पर्धकाने मांडलेल्या व्यवसायाच्या संकल्पनेबद्दल बोलताना नुकतंच नमिताने याबद्दल पुन्हा भाष्य केलं. या नव्या भागातील २ तरुणी अंगाने थोड्या धष्ट-पुष्ट असणाऱ्या महिलांसाठी फॅशनेबल कपडे बनवायचं काम करत आहेत.

आणखी वाचा : ‘बी ग्रेड’ चित्रपटविश्वावर भाष्य करणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; उलगडणार इंडस्ट्रीची वेगळी बाजू

त्यांच्या व्यवसायाबद्दल काही शंका विचारताना नमिता म्हणाली, “आपल्या देशात हे जे बॉडी शेमिंग होतं, एखाद्याला जाड किंवा बारीक म्हणून डिवचणं, हे माझ्या बाबतीतही झालं आहे. मग तुम्ही केवळ अशा महिलांसाठी कपडे बनवायचा निर्णय का घेतला नाही?” यावर त्या तरुणीने उत्तर दिलं की, “जर आम्ही त्यांच्यासाठीच कपडे बनवले तर त्यांना इतरांपासून तोडल्यासारखं वाटेल, आमचा तो उद्देश नसून त्या महिलांना इतरांप्रमाणेच वागणूक मिळावी हा हेतू आहे.”

मध्यंतरी लेखक चेतन भगत यांच्याबरोबर आयोजित केलेल्या टॉक शोमध्येसुद्धा नमिताने तिला आलेल्या या अनुभवांबद्दल भाष्य केलं होतं. तेव्हा त्या मुलाखतीमध्ये नमिता म्हणाली, “लहानपणी मी अशी नव्हते, मी खूप जाड होते माझ्या चेहेऱ्यावरची केस होते, त्यावेळी मला बऱ्याचदा ‘मीशी असलेली मुलगी’ म्हणून चिडवलं जायचं. कोणताही मुलगा माझ्याकडे आकर्षित होईल अशी मी अजिबात नव्हते. माझ्यामते लहानपणी होणाऱ्या या बॉडी शेमिंगचा तुमच्या भवितव्यावर प्रचंड परिणाम होतो.” नमिता ही एमक्युअर फार्मा कंपनीची डायरेक्टर आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 10:14 IST

संबंधित बातम्या