'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता आता याच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. नवनवीन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करण्याचं काम या कार्यक्रमामधील परीक्षक मंडळी करतात. पण या नव्या सीझनमधील परीक्षकांमध्ये काही बदल झाले आहेत. अशनीर ग्रोवर यांच्या जागी आता अमित जैन या सीझनचं परीक्षक म्हणून काम पाहतील. आणखी वाचा - सह-अभिनेत्रीच्या स्तनांवर हात ठेवत काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे श्रद्धा आर्या ट्रोल; अंजुम फकीह म्हणाली, “काही लोक माझ्या…” अमित जैन आहेत तरी कोण?'शार्क टँक इंडिया २'मध्ये परीक्षक म्हणून काम पाहणारे अमित जैन हे मुळचे जयपूरचे आहेत. आयआयटी दिल्ली येथे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. याआधी आपला व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी ऑस्टिन आणि टेक्सस कंपनीमध्ये काम केलं. ते 'कार देखो' या कंपनीचे मालक आहेत. २००७मध्ये त्यांनी आपल्या भावाबरोबर ही कंपनी सुरु केली. शोच्या नव्या प्रोमोमध्ये अमित यांची झलक पाहायला मिळाली. अनुपम मित्तल, अमन गुप्ता, नमिता थापर, विनीता सिंह या परीक्षकांबरोबरच आता अमित जैन यांचंही नाव जोडलं गेलं आहे. पण अनशीर ग्रोवर यांना या कार्यक्रमामधून का वगळ्यात आलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण प्रेक्षक मात्र अनशीर ग्रोवर या शोमध्ये नसल्याने नाराज झाले आहेत. आणखी वाचा - अवघ्या विशीत दोनवेळा कर्करोगाशी झुंज अन् आता ब्रेन स्ट्रोकचा सामना करतेय प्रसिद्ध अभिनेत्री, रुग्णालयात उपचार सुरु काही वृत्तानुसार, नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या नव्या सीझनला सुरुवात होईल. अनशीर ग्रोवर यांचा स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. आता अमित जैन यांना प्रेक्षक कितपत पसंती देणार हे पाहावं लागेल.