Sharmila Shinde Nomination Party look: झी मराठी वाहिनीचा २०२६ मधील पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. प्रत्येक मालिकेतील कलाकारांना वेगवेगळ्या श्रेणीत नामांकनं मिळाली आहेत. नुकताच नॉमिनेशन सोहळा पार पडला. यावेळी कलाकारांनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. प्रत्येक कलाकाराच्या या वेगळ्या अंदाजावर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. यंदाच्या नॉमिनेशन सोहळ्याची पिकनिक थीम होती.
आता अभिनेत्री शर्मिला शिंदेने एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने या सोहळ्यातील तिच्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. तिने आकाशी आणि लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या फोटोत तिच्या हातात एक बास्केट दिसत आहे. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे.
“म्हणून मी हँड बॅग म्हणून…”
हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “या वर्षाची झी मराठी नॉमिनेशन पार्टीची थीम ‘Glam पिकनिक’ ही होती, म्हणून मी हँड बॅग म्हणून पिकनिक बास्केट घेऊन गेले तर माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांचे फ़ोन आणि पाऊच माझ्या बास्केटमध्ये ठेवायला दिले आणि माझ्या क्रिएटिव्हिटीचं मला ओझं केलं. आय हेट माय फ्रेंड्स (I hate my friends).
शर्मिलाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. शरयू सोनावणे, पूर्वा कौशिक, पल्लवी वैद्य, सारंग साठ्ये या कलाकारांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत, तर नेटकऱ्यांनीही कमेंटस करत त्यांचे मत मांडले आहे; तर काहींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
एकाने हसण्याच्या इमोजी शेअर करत लिहिले, “तुझ्याबरोबर खूप वाईट झालं”, दुसऱ्याने लिहिले, “किती गोड दिसतेस, पण त्यांचं हे वागणं बरोबर नव्हे”, असे लिहित हसण्याच्या इमोजी शेअर केल्या. एकाने लिहिले, “बॅग अशीच आहे, पण तुझा लूक छान आहे.”
दरम्यान, शर्मिला मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. तशीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती पोस्ट शेअर करत विविध गोष्टी शेअर करत असते.
