Shashank Ketkar on Muramba serial: ‘मुरांबा’ ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील रमा अक्षय, त्यांची मुलगी आरोही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मालिकेत येणारे ट्विस्ट, घडणाऱ्या विविध घटना यांमुळे या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे.

मुरांबा मालिकेबाबत बोलायचे तर अक्षय आणि रमाचे लग्न झाले तेव्हा अक्षय रेवाच्या प्रेमात होता. त्यामुळे अशिक्षित, दोन वेण्या घालणारी, घरात काम करणारी रमाबद्दल त्याला फारसा दयाभाव, प्रेम या भावना नव्हत्या. मात्र, काळ पुढे सरकला तसे रमा आणि अक्षयची मैत्री झाली.

पुढे ते प्रेमात पडले. प्रेमात पडल्यानंतर रेवा पुन्हा अक्षयच्या आयुष्यात आली. तिने त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रमाक्षय वेगळे झाले नाहीत. त्यांनी कायमच एकमेकांची साथ दिली.

पुढे मालिकेत मोठा ट्विस्ट आला. अक्षयची इरावती आत्या परत आली. तिने रमा आणि अक्षयला एकमेकांपासून दूर केले. विशेष म्हणजे त्यांना तेव्हा एक मुलगी झाली होती. मात्र, आत्याच्या कारस्थानामुळे रमाला मुलगी आणि अक्षयसह मुकादम कुटुंबापासून दूर राहावे लागले.

सात वर्षानंतर जेव्हा जेव्हा रमा-अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला आले तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले होते. रमाचा लूक बदलला होता. अक्षय जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली होता. पण, त्याच्या आयुष्यात त्यांची गोड मुलगी आरोही होती. अक्षयच्या मनात रमाविषयी राग होता.

जेव्हा आरोहीला समजले की रमाच तिची आई आहे, त्यावेळी तिने अक्षय आणि रमाला एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि रमाला एकत्र आणण्याासठी नानाविध प्रयत्न करताना दिसते. कधी तिच्या प्रयत्नांना यश मिळते, तर कधी तिच्या कल्पना फसतात. आता रमाच्या मनात अक्षय विषयी जे प्रेम आहे, ते तिने बोलून दाखवावे यासाठी आरोही प्रयत्न करताना दिसत आहे.

‘मुरांबा’ मालिकेच्या १२०० भागांचा टप्पा पूर्ण

आता या मालिकेने नुकताच १२०० भागांचा टप्पा पार केला. याविषयी सोशल मीडियावर रीलदेखील पाहायला मिळाल्या. स्टार प्रवाह वाहिनीनेदेखील मालिकेचा १२०० भाग पूर्ण झाल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

आता स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेली पोस्ट त्याच्या अकाउंटवर शेअर करत शशांक केतकरने लिहिले, “खरंच विश्वास बसत नाहीये की मालिकेचे १२०० भाग पूर्ण झाले. ” पुढे त्याने लिहिले, “अजूनही तितक्याच ताकदीने, आनंदाने प्रवास सुरू आहे आणि सुरूच राहील.”

तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये रमा आणि अक्षयसह मालिकेची संपूर्ण एकत्र येत १२०० भाग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असल्याचे दिसले. या मालिकेत अक्षय ही भूमिका अभिनेता शशांक केतकरने साकारली आहे. तर रमा ही भूमिका शिवानी मुंढेकरने साकारली आहे.

दरम्यान, रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र कधी येणार, आरोहीच्या प्रयत्नांना कधी यश मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.