scorecardresearch

Video: “दिवसाचे रातकिडे पाहिलेत का?” शशांक केतकरने ‘तो’ व्हिडीओ रेकॉर्ड करताच अभिनेत्रीने काय केलं, तुम्हीच पाहा!

शशांक केतकरने ‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवरून शिवानीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

shahank ketkar
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट्स)

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिका साकारतो आहे. त्याच्याबरोबर शिवानी मुंढेकर मालिकेतील मुख्य अभिनेत्री आहे. शशांक या मालिकेत अक्षय मुकादम नावाचं पात्र साकारत आहे. या मालिकेचं शूटिंग करत असतानाचे अनेक मजेशीर व्हिडीओ शशांक केतकर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ त्याने आता शेअर केला आहे.

“महाराष्ट्रात एका स्त्रीची…” गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडेंची संतप्त प्रतिक्रिया

शशांकने शिवानीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्ही दिवसाचे रातकिडे कधी बघितले आहेत का? असा प्रश्न तो विचारतो आणि नंतर शिवानीकडे कॅमेरा नेतो. ती खुर्चीवर डोळे बंद करून बसलेली दिसते. तिथे शशांक म्हणतो,” नाही नाही, हे दिवसाची रात्र करून, नाही रात्रीचे दिवस करून झोपलेली आहे. बाकी काही नाही, मी हे दाखवतोय” असं म्हणत तो तिथे लुकलुकणाऱ्या प्रकाशाकडे बोट दाखवतो. तेवढ्यात शिवानी खुर्चीवर उठते आणि शशांकच्या मानेला धक्का देते. त्यानंतर किडे बघितलेत का? असं शशांक व्हिडीओत विचारतो.

“शशांकने दिवसाचे रात किडे … इकडे तिकडे चोही किडे शिवानी मुंढेकर आता सगळ्यांना कळेल, सेटवर कोण कोणाला त्रास देतं,” असं कॅप्शन देत शशांकने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. ‘रमा-अक्षयची ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूप सुंदर आहे. तुमची जोडी बेस्ट आहे,’ ‘दिवसाचे रात किडे त्रास देणारे असले तरी खूप गोड सुंदर आहेत’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहिंनी मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे, असंही विचारलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 11:26 IST
ताज्या बातम्या