scorecardresearch

Premium

“बायको Happy Anniversary”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण! पत्नीला म्हणाला, “चिडक्या, भावुक…”

शशांक केतकरने बायको प्रियांका ढवळेसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

shashank ketkar 6th marriage anniversary
शशांक केतकरच्या लग्नाचा वाढदिवस

चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शशांकने खास पोस्ट शेअर करत बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लाडक्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शशांकने खास पोस्ट शेअर केली आहे. यात अभिनेता म्हणतो, “बायको Happy Anniversary! आज मी जो काही आहे…तो फक्त तुझ्यामुळे. तू माझ्यातील चिडक्या, भावुक, भांडणाऱ्या, व्यवहारी, अत्यंत तत्त्वनिष्ठ, कधी कधी खूप विचित्र वांगणाऱ्या, कधी कधी प्रचंड त्रास देणाऱ्या, मस्ती करणाऱ्या शशांकला कायम सांभाळून घेतेस. म्हणूनच म्हणतोय… तू आहेस म्हणून मी आहे.”

Prathamesh Parab dance on shahrukh khan gerua song in engagement ceremony, video viral
Video: साखरपुड्यात प्रथमेश परबचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
shivani ajinkya
लग्नानंतर शिवानी व अजिंक्य पोहोचले हनिमूनला; रोमँटिक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझ्या बायकोची…”
muramba fame actor Shashank Ketkar bought new house
शशांक केतकरने घेतलं नवं घर, स्वतः खुलासा करत म्हणाला “मला सोशल मीडियावर…”
Actress Shivani Surve was removed from the Hindi popular serial after two-three days
शिवानी सुर्वेला दोन-तीन दिवसांतच ‘या’ लोकप्रिय हिंदी मालिकेतून टाकलं होतं काढून, अभिनेत्री स्वतः किस्सा सांगत म्हणाली…

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अनघाला मालिकेतील ‘या’ कलाकाराने दिलं हटके गिफ्ट! अभिनेत्री म्हणाली, “आणखी एक…”

शशांक केतकरने जुन्या मुलाखतींमध्ये सांगितल्यानुसार त्याची आणि प्रियांकाची ओळख फेसबुकवर झाली. दोघेही एकमेकांशी गप्पा मारायचे पण, कालांतराने शशांक कामात व्यग्र झाला आणि सोशल मीडियापासून दूर गेला. पुढे, एका कार्यक्रमात दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. प्रियांका उत्तम भरत नाट्यम डान्सर असल्याने त्या स्पर्धेत तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या निमित्ताने दोघांची नव्याने ओळख होऊन अखेर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि शशांक-प्रियांकाने ४ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केलं.

हेही वाचा : “पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा…”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; म्हणाली, “माहेर अन् सासर…”

दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या जोडप्याला ऋग्वेद नावाचा मुलगा असून आता तो ३ वर्षांचा झाला आहे. शशांक-प्रियांकाने ऋग्वेदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shashank ketkar shares special anniversary post for his wife priyanka dhavale sva 00

First published on: 04-12-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×