Shashank Ketkar And Priyanka Ketkar Video: बिग बॉस हा असा रिअॅलिटी शो आहे, ज्याचा चाहतावर्ग मोठा आहे. संपूर्ण देशभरात हा शो पाहिला जातो. हिंदी, मराठी, कन्नड आणि इतर भाषांमध्येदेखील हा शो प्रदर्शित होतो. अनेक कलाकारही या शोचे चाहते आहेत.
आता अभिनेता शशांक केतकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या पत्नीबरोबर दिसत आहे. पत्नीसह शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शशांक केतकर म्हणाला…
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, शशांक रागाने विचारतो की, किती वाजलेत? झोपायची वेळ झाली आहे. असे मुद्दे तुला सुचतात कसे? ही भांडणे शिकतेस कुठून? त्यानंतर त्याची पत्नी त्याला बाजूला करते, तर समोर टीव्हीवर बिग बॉसचा एपिसोड लावला असल्याचे दिसते. ते पाहून शशांक कपाळावर हात मारून घेतो. तो कॅमेरा फिरवतो आणि म्हणतो की, इथून शिकतेस भांडणे? त्यावर त्याची पत्नी प्रियांका हसत हो म्हणते. त्यानंतर ती मोठ्याने हसताना दिसते. शेवटी तो हसताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना, ‘शशांकभाऊंना धक्का’, अशी कॅप्शन दिली आहे. आता या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने लिहिले, “सर पुढच्या बिग बॉसमध्ये तुम्ही जा”, त्यावर प्रियांका केतकरने शशांकला टॅग करीत लिहिले, “आपण सगळ्यांचं खूप मनोरंजन करू”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आईशपथ, शशांकला खरंच खूप मोठा धक्का बसला”, आणखी एका नेटकऱ्याने प्रियांका केतकरला टॅग करीत लिहिले, “तुम्ही पुढे जा. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. पुढचा सीझन तुझाच आहे.”




एका नेटकऱ्याने लिहिले, “झोपण्याआधी बिग बॉस पाहिलंच पाहिजे. त्यामुळे आपल्याला भांडणाचे नवीन विषय मिळतात.”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने हसण्याच्या इमोजी शेअर करीत लिहिले, “प्लीज काही शिकू नका”, एकाने लिहिले, “तुम्ही दोघे मिळून बिग बॉसला सरळ कराल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
शशांक केतकर हा त्याची वक्तव्ये, तसेच सोशल मीडियावरील पोस्ट यांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होताना दिसतात. अभिनेता अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबरदेखील पोस्ट शेअर करतो. शशांक केतकर सध्या मुरांबा या मालिकेत काम करीत आहे. त्यात तो अक्षय ही भूमिका साकारत आहे.
दरम्यान, सध्या बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रेक्षकांचे भेटीला आले आहे. सध्या या शोचीदेखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
