'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाला (Shefali Jariwala) अवघं १९ वर्षे वय असतानाच तिच्या म्युझिक व्हिडीओतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका गाण्याने ती घराघरांत ओळखली जाऊ लागली. या गाण्यातून प्रसिद्धी मिळाल्यावर ती सलमान खान, प्रियांका चोप्रा व अक्षय कुमार यांच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातही झळकली होती. करिअरमध्ये अनेक रिअॅलिटी शो करणारी शेफाली आता ४१ वर्षांची आहे. ती अखेरची २०१९ मध्ये 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. शेफाली जरीवालाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. शेफाली जरीवाला सध्या कोणत्याही शोमध्ये काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. शेफालीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, या मुलाखतीत ती आई होऊ शकत नसल्याचं तिने सांगितलं. Bigg Boss Marathi: पहिल्याच आठवड्यात ‘हा’ स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर, छोटा पुढारी झाला भावुक पारस छाबराच्या शोमध्ये शेफाली जरीवालाला बाळाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, "मूल जन्माला कुणीली घालू शकतं, पण मला वाटतं की जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना घराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो, पण जो दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात आणतो आणि त्याचे पालनपोषण करतो तो सर्वात महान आहे. वयाच्या १२-१३ व्या वर्षी जेव्हा मला मूल दत्तक घेणं ही गोष्ट समजली तेव्हापासूनच माझ्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता." शेफाली जरीवाला व तिचा पती पराग त्यागी (फोटो - इन्स्टाग्राम) वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos शेफाली बाळ दत्तक घेण्याबद्दल काय म्हणाली? Shefali Jariwala on Baby Adoption: शेफाली जरीवाला पुढे म्हणाली, "बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयात तुम्हाला पती व तुमच्या कुटुंबियांचाही पूर्ण पाठिंबा असावा लागतो. आमच्या घरात मूल दत्तक घ्यायला सगळे तयार आहेत, पण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी लांब असते की त्या काळात मुलं मोठी होतात. प्रत्येकाला लहान मूल हवं असतं. पराग आणि मी खूप दिवसांपासून मूल दत्तक घेण्याचा विचार करत होतो, पण ते शक्य होत नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात खूप अंतर आहे." हेडफोनशिवाय बघू नका OTT वरील ‘हे’ चित्रपट, बोल्ड कंटेटचा आहे भडीमार वयाच्या अंतराबद्दल शेफाली म्हणाली… Shefali Jariwala on Baby Planning: बाळाच्या नियोजनाबाबत शेफाली म्हणाली, "माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत. आता वाटतं की जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हाच आमच्या घरी नवीन पाहुणा येईल." यानंतर पारसने तिला मुलगा हवा की मुलगी याबाबत विचारलं. त्यावर शेफालीने सांगितलं की तिला व पती परागला मुलगी हवी आहे. पण जे नशीबात असेल तेच होईल, असं तिने म्हटलं. शेफाली ४१ वर्षांची असून तिचा पती पराग ४८ वर्षांचा आहे.