Shilpa Navalkar : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचं संपूर्ण कथानक सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि प्रतिमा या पात्राभोवती फिरतं. नुकतीच मालिकेत प्रतिमाची एन्ट्री झाली आहे. तिची स्मृती परत आणण्यासाठी सायली अन् पूर्णा आजी खूप प्रयत्न करत असल्याचं सध्या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतिमाची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकर साकारत आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व लेखिका म्हणून शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) यांना ओळखलं जातं. ‘ठरलं तर मग’ मालिका त्याच लिहित आहेत. ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असताना शिल्पा नवलकर एका नव्या मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. ही मालिका कोणती आहे याबद्दल जाणून घेऊयात…

tharala tar mag pratima become emotional
ठरलं तर मग : का रे दुरावा…; सायलीचं गाणं ऐकताच प्रतिमाला अश्रू अनावर, लेकीला मिठी मारून रडली, भावुक प्रोमो चर्चेत
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
tharala tar mag rakshabandhan special
ठरलं तर मग : जुन्या रुपात अवतरली प्रतिमा! भावुक होत पूर्णा आजीने चक्क सायलीलाच बांधली राखी; नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”
tharala tar mag pratima in danger
ठरलं तर मग : सायलीची मृत्यूशी झुंज तर, प्रतिमाचा जीव धोक्यात…; ‘या’ दिवशी असणार महाएपिसोड; पाहा जबरदस्त प्रोमो
tharala tar mag sayali pratima and raviraj killedar perform Ganpati pooja
ठरलं तर मग : प्रियाचा डाव फसला! पूर्णा आजीचा ‘तो’ निर्णय अन् प्रतिमा-रविराजसह सायलीने केली बाप्पाची पूजा, पाहा प्रोमो
zee marathi new serial prapti redkar will appear in Savlyachi Janu Savali upcoming serial
Video: ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा जबरदस्त नवा प्रोमो
tharala tar mag new promo
ठरलं तर मग : प्रियाने धक्का मारताच सायली जिन्यावरून घसरली! बायकोला बेशुद्ध पाहताच अर्जुन बिथरला…; पाहा नवीन प्रोमो

हेही वाचा : ‘पिया तू अब तो आजा…’, सदस्यांचा जबरदस्त डान्स अन् घरात झाली दोन नवीन पाहुण्यांची एन्ट्री! कोण आहेत ते? एकदा पाहाच…

‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकताच त्यांच्या ‘दुर्गा’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला. या मालिकेत अनन्याचा प्रतिशोध घेणाऱ्या दुर्गाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अभिनेत्री रुमानी खरे साकारणार आहे. तर तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील अंबर गणपुळे झळकणार आहे. अंबर यामध्ये अभिषेक हे पात्र साकारणार आहे. वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये रुमानी अन् अंबर यांच्यासह शिल्पा नवलकर यांची झलक पाहायला मिळते.

शिल्पा नवलकर यांचा रुबाबदार अंदाज

शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) मालिकेच्या प्रोमोमध्ये एकदम रुबाबदार अंदाजात एन्ट्री घेत असल्याचं पाहायला मिळतं. भरजरी दागिने, सुंदर साडी साडी, हातात चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर असा त्यांचा मालिकेत एकदम डॅशिंग लूक असणार आहे. शिल्पा नवलकर या नव्या मालिकेत अभिषेकच्या आईची भूमिका साकारणार आहेत. अभिषेकच्या आईची भूमिका खलनायिकेची आहे असा अंदाज प्रोमो पाहून येत आहे.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर येणार नवीन मालिका! ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता प्रमुख भूमिकेत, तर अभिनेत्री…; पाहा जबरदस्त प्रोमो

shilpa navalkar
शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) झळकणार नव्या भूमिकेत ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

दरम्यान, ‘दुर्गा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता नव्या मालिकेत एन्ट्री घेतल्यावर शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) ‘ठरलं तर मग’मधून एक्झिट घेणार की दोन्ही मालिका एकत्र करणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार्‍या नव्या वळणांवरून याचा अंदाज प्रेक्षकांना लवकरच येईल. याशिवाय ‘दुर्गा’च्या प्रसारणाची तारीख अन् वेळ ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.