Shilpa Navalkar : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचं संपूर्ण कथानक सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि प्रतिमा या पात्राभोवती फिरतं. नुकतीच मालिकेत प्रतिमाची एन्ट्री झाली आहे. तिची स्मृती परत आणण्यासाठी सायली अन् पूर्णा आजी खूप प्रयत्न करत असल्याचं सध्या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतिमाची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकर साकारत आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व लेखिका म्हणून शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) यांना ओळखलं जातं. ‘ठरलं तर मग’ मालिका त्याच लिहित आहेत. ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असताना शिल्पा नवलकर एका नव्या मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. ही मालिका कोणती आहे याबद्दल जाणून घेऊयात…
‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकताच त्यांच्या ‘दुर्गा’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला. या मालिकेत अनन्याचा प्रतिशोध घेणाऱ्या दुर्गाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अभिनेत्री रुमानी खरे साकारणार आहे. तर तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील अंबर गणपुळे झळकणार आहे. अंबर यामध्ये अभिषेक हे पात्र साकारणार आहे. वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये रुमानी अन् अंबर यांच्यासह शिल्पा नवलकर यांची झलक पाहायला मिळते.
शिल्पा नवलकर यांचा रुबाबदार अंदाज
शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) मालिकेच्या प्रोमोमध्ये एकदम रुबाबदार अंदाजात एन्ट्री घेत असल्याचं पाहायला मिळतं. भरजरी दागिने, सुंदर साडी साडी, हातात चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर असा त्यांचा मालिकेत एकदम डॅशिंग लूक असणार आहे. शिल्पा नवलकर या नव्या मालिकेत अभिषेकच्या आईची भूमिका साकारणार आहेत. अभिषेकच्या आईची भूमिका खलनायिकेची आहे असा अंदाज प्रोमो पाहून येत आहे.
हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर येणार नवीन मालिका! ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता प्रमुख भूमिकेत, तर अभिनेत्री…; पाहा जबरदस्त प्रोमो
दरम्यान, ‘दुर्गा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता नव्या मालिकेत एन्ट्री घेतल्यावर शिल्पा नवलकर ( Shilpa Navalkar ) ‘ठरलं तर मग’मधून एक्झिट घेणार की दोन्ही मालिका एकत्र करणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार्या नव्या वळणांवरून याचा अंदाज प्रेक्षकांना लवकरच येईल. याशिवाय ‘दुर्गा’च्या प्रसारणाची तारीख अन् वेळ ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd