Bigg Boss 18 : सलमान खानचा बहुचर्चित शो ‘बिग बॉस’चं १८वं पर्व ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अवघ्या दोन दिवसांवर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पर्वात कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार आणि कोणत्या कलाकारांनी सलमानचा हा बहुचर्चित शो नाकारला याची चर्चा रंगली आहे. अशातच ‘कलर्स टीव्ही’ने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होणाऱ्या काही सदस्यांचे प्रोमो शेअर केले आहेत.

‘कलर्स टीव्ही’ने सोशल मीडियावर सर्वात आधी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा प्रोमो शेअर केला आहे. ९०चं दशक आपल्या बोल्ड आणि घायाळ अदांनी गाजवणाऱ्या या मराठी चेहऱ्याची ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात एन्ट्री होणार असल्याचं निश्चित झालं आहे. शिल्पा शिरोडकर यांचा दमदार प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे. त्यांचं सलमान खानबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं; जे आता ‘बिग बॉस १८’च्या माध्यमातून पूर्ण होतं असल्याचं शिल्पा शिरोडकर यांनी सांगितलं आहे.

Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
actress sreejita de and michael bengali wedding
Bigg Boss फेम अभिनेत्री पुन्हा करतेय लग्न, दीड वर्षापूर्वी जर्मन तरुणाशी बांधली लग्नगाठ
shiv thakare and big boss 16 contenstant dancing video
Video : ‘लडकी आंख मारे’वर शिव ठाकरे थिरकला, त्याच्यासह Bigg Boss १६ च्या स्पर्धकांनीही केला डान्स; चाहते म्हणाले, “चुगली करणारे…”
Salman Khan And Hema Sharma
“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
bigg boss marathi meenal shah built luxurious bungalow in goa
Bigg Boss फेम अभिनेत्रीने गोव्यात बांधला भलामोठा आलिशान बंगला! ‘ड्रीम हाऊस’ म्हणत शेअर केले फोटो; म्हणाली, “हा प्रवास…”

हेही वाचा – Video: नव्या मालिकेतील नायिकांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दंगा, पुन्हा एकदा सूरजला सुतरफेणी ओळखताना आले नाकीनऊ, पाहा प्रोमो

शिल्पा शिरोडकर यांचं खास नातं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी आहे. महेश बाबूच्या त्या मेव्हूणी आहेत. शिल्पा शिरोडकर यांची सख्खी बहीण नम्रता शिरोडकर महेश बाबूची पत्नी आहे.

शिल्पा शिरोडकर यांच्यानंतर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील दुसऱ्या स्पर्धकाचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा स्पर्धक मूळचा पंजाबचा असून त्याने जवळपास चार मालिका केल्या आहेत. पण एकेदिवशी निर्मात्याने या अभिनेत्याला सर्वांसमोर अपमानित करून सेटवरून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. आता हाच अभिनेता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होत आहे. या अभिनेत्याचा प्रोमो पाहून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील शेहजादा धामी असल्याचा नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.

हेही वाचा – “फक्त उत्सव नाही…”, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केल्यानंतर क्षितिज पटवर्धनसह मराठी कलाकारांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…

याशिवाय ‘बिग बॉस १८’च्या आणखी एका स्पर्धकाचा जबरदस्त प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमधील अभिनेत्री ‘नाथ कृष्ण और गौरी की कहानी’ मालिकेतील चाहत पांडे असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

‘बिग बॉस १८’ची थीम

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात बरंच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे नेमकं शोमध्ये काय असणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.