सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. काहींच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे तर काहींचे होणार आहे.
अनेक कलाकारांच्या घरही गणरायाचे आगमन झाले आहे. मराठीसह हिंदी आणि साऊथच्या अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. मराठी बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेला शिव ठाकरेच्या घरातही गणपती बाप्पाचे आगमन झालं आहे. शिवचा गणपती खूपच खास आहे. शिवने पोलिसांचा गणवेश परिधान केलेला गणपती बाप्पा घरी आणला आहे. शिव ठाकरेचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाजत गाजत जंगी मिरवणूक काढत शिवने गणपती बाप्पा घरी आणला. या मिरवणूकीत ५० पोलीस सहभागी झाले होते. पोलीस थीम असलेला गणपतीची प्रतिष्ठापणा करुन शिवने मुंबई पोलिसांना मानवंदना दिली. २०२२ मध्येही शिव अशाच प्रकारचा गणपती आणला होता. त्यावेळेस त्याने यबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता.
शिव ठाकरे सुरुवातीला ‘रोडीज’मध्ये दिसला होता. मात्र ‘बिग बॉस १६’ मधून त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये भाग घेतला होता. तसेच शिवचे काही म्युझिक व्हिडिओही प्रदर्शित झाले आहेत.