Shiv Thakare Dance : अनेक रिअ‍ॅलिटी शोजमध्ये सहभागी होत आपल्या खेळाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या त्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. शिव ठाकरेने आजवर ‘बिग बॉस मराठी’, ‘बिग बॉस १६’ हिंदी अशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस १६’ने शिव ठाकरेला खरी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळे शिव ठाकरे हिंदी प्रेक्षकांमध्येही ओळखला जाऊ लागला. मराठमोळ्या शिव ठाकरेने हिंदी बिग बॉसमध्ये जाऊन फायनलपर्यंत मजल मारली होती. या सीजनचा तो उपविजेता ठरला होता. आता याच सीजनमधील स्पर्धकांबरोबर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो ‘बिग बॉस १६’ च्या स्पर्धकांबरोबर डान्स करताना दिसत आहे.

प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर रोहित वर्माच्या बर्थ डे पार्टीला ‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धक सहभागी झाले होते. रोहित वर्माच्या बर्थ दे पार्टीला ‘बिग बॉस १६’मधील शिव ठाकरे बरोबर रश्मी देसाई, मनारा चोप्रा सहभागी झाले होते. ‘बिग बॉस १६’च्या या सर्व स्पर्धकांनी मिळून ‘लडकी आंख मारे’वर डान्स केला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”

हेही वाचा…‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकेचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…

‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टा पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यात शिव ठाकरे (Shiv Thakare), रश्मी देसाई (Rashmi Desai) सुरुवातीला दिसतात. त्यानंतर ‘सिम्बा’ सिनेमातील ‘लडकी आंख मारे’ हे गाणं सुरू होतं. गाणं सुरू होताच शिव ठाकरे(Shiv Thakare) आणि रश्मी जागेवरच उभं राहून डान्स करतात. त्यानंतर व्हिडीओमध्ये मनारा चोप्राची (Mannar Chopra) एंट्री होते. तीसुद्धा रश्मी आणि शिव यांच्याबरोबर जागीच उभं राहून डान्स करते. गाण्यात जेव्हा ‘लडकी आंख मारे’ हे बोल येतात, तेव्हा शिव ठाकरे या गाण्याची हुक स्टेप करत डान्स करतो.

या डान्सवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “मनारा आणि शिव डान्स करताना क्युट दिसत आहेत”, तर आणखी एका युजरने लिहिले की, “सर्व चुगली करणारे एकत्र दिसत आहेत”, तर एका नेटिझनने लिहिले, “एक हिरो आणि तीन ज्युनियर आर्टिस्ट.” अशा काही कमेंट्स युजरने केल्या आहेत.

netizens commented on shiv thakare and big boss 16 contestant dance
शिव ठाकरेने बिग बॉस १६ मधील स्पर्धकांबरोबर डान्स केला असून त्या व्हिडीओवर नेटिझन्सने कमेंट केल्या आहेत. (फोटो क्रेडिट – इन्स्टंट बॉलीवूड)

हेही वाचा…“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”

netizens commented on big boss 16 contestant dance video
‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धकांनी ‘लडकी आंख मारे’ या गाण्यावर डान्स केला असून त्या व्हिडीओवर नेटिझन्सने कमेंट केल्या आहेत. (फोटो क्रेडिट – इन्स्टंट बॉलीवूड)

शिव ठाकरे आणि ते पाच रिअ‍ॅलिटी शो

शिव ठाकरे आजवर पाच रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. यातील बहुतेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याने त्याच्या खेळाच्या जोरावर अंतिम फेरी किंवा सेमी फायनलपर्यंत मजल मारली आहे. २०१७ मध्ये शिव ठाकरे एम टीव्हीच्या ‘रोडीज’ या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. २०१९ मध्ये मराठी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होत त्याने हा शो जिंकला होता, तर २०२२ मध्ये त्याने ‘बिग बॉस १६’ (हिंदी) मध्ये सहभागी होत या शोचे उपविजेतेपद मिळवलं होतं. शिव ठाकरे २०२३ मध्ये ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या सीजनमध्ये सहभागी झाला होता, तर ‘झलक दिखला’च्या ११ व्या पर्वात त्याने सहभाग घेतला होता.

Story img Loader