Sonali Raut Nominated Roshan Bhajankar Bigg Boss Marathi 6 Latest Promo: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या आठवड्यात बऱ्याच सदस्यांचे वाद पाहायला मिळाले. नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. नॉमिनेशन टास्कच्या एका प्रोमोत तन्वी कोलते सागर कारंडेला अरे-तुरेच्या भाषेत बोलली. त्यानंतर आता एक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे. यामध्ये सोनाली राऊतने विदर्भाच्या रोशन भजनकर पतंग कापली आणि त्याला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले.
नेमकं काय घडलं?
नॉमिनेशनसाठी ‘पतंग’ कापण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी सोनालीने स्पष्टपणे सांगितले की, “इतर सदस्यांच्या तुलनेत रोशनचे घरातील योगदान अत्यंत कमी आहे.” सोनालीच्या या विधानामुळे रोशनच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले आणि घरात वादाची ठिणगी पडली.
सोनालीने नॉमिनेट केल्यावर रोशन म्हणाला…
सोनालीने नॉमिनेट केल्यामुळे रोशन चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. संतापाच्या भरात त्याने सोनालीवर वैयक्तिक टीका करताना म्हटलं की, “शहरातल्या माणसांचे हेच काम असते, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन वर जायचे. रोशनची गेममधील पकड कमी असल्याने त्याला नॉमिनेट करणे योग्य असल्याचे तिने म्हटले. तर रोशनने तिला “आता तुमच्याकडून ट्युशन घ्यावी लागेल,” असं म्हणत सोनालीवर उपरोधिक टीका केली.
पाहा बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो
शिव ठाकरेची कमेंट
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर बिग बॉस मराठी २ चा विजेता, अमरावतीकर शिव ठाकरेने कमेंट केली आहे. शिवने “धीर धर, वेळ येईल”, असं प्रोमोवर कमेंट करत म्हटलंय.

दरम्यान, आजचा बिग बॉसचा एपिसोड फारच रंजक ठरणार आहे. तन्वी कोलते सागर कारंडेला नॉमिनेट करत अरे-तुरे करत बोलली. हा प्रोमो समरो आल्यावर नेटकऱ्यांनी तन्वीला सुनावल्याचं पाहायला मिळालं. आता उर्वरित सदस्यांपैकी कोण कोणाला नॉमिनेट करणार, ते आजच्या एपिसोडमध्ये पाहता येईल.
सोनाली व रोशन यांच्या वादाचा हा संपूर्ण राडा आणि नॉमिनेशनची ही थरारक प्रक्रिया तुम्हाला आज रात्री ८ वाजता पाहायला मिळेल.
