चित्रपट, मालिकांमध्ये दिसणारे कलाकार हे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. डान्स व्हिडीओ, विनोदी रील्स या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. अनेकदा त्यांच्या आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांबरोबर शेअर करतात. कुटुंबिय, जवळचे मित्रमंडळी, कलाकार मित्रपरिवार यांच्याबरोबरच अनेक फोटो हे कलाकार शेअर करतात. आता शिवा फेम अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर अभिनेत्री सृष्टी बहेकरबरोबरचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्याबरोबर मालिकेत तिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सृष्टी बहेकर दिसत आहे. वेगवेगळ्या पोज देत त्यांनी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्री लिहिले की जिथे शब्दांचीही गरज भासत नाही, अशा सुंदर नात्यात मी हरवले आहे. या दोन सहअभिनेत्रींमध्ये उत्तम मैत्री असल्याचे पाहला मिळते. अनेकदा या पूर्वा व सृष्टी डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. ऑनस्क्रीन बहिणी असलेल्या या अभिनेत्रींमध्ये खास बॉण्ड असल्याचे असल्याचे बऱ्याचदा पाहायला मिळते. पूर्वाने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे. अभिनेत्री शर्वरी जोगने या फोटोंवर कमेंट करीत हार्ट इमोजी शेअर केली आहे.

Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Swanandi Tikekar new home
स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट

शिवा या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा ही भूमिका साकारली आहे. तर सृष्टी बहेकरने शिवाची बहीण दिव्या ही भूमिका साकारली आहे. शिवा ही कणखर, परिवाराची काळजी घेणारी अशी आहे. तर दिव्या शिवाविरूद्ध कटकारस्थान करणारी अशी आहे. सध्या मालिकेत दिव्या व किर्तीने मिळून शिवाविरूद्ध कारस्थान केले. त्यांच्यामुळे आशू व शिवामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आता आशू व नेहाच्या लग्नाच्या विधींनी सुरूवात झाली आहे. मेंहदी, संगीत सोहळ्याला सुरूवात झाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. याबरोबरच, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये चंदनने दिव्याचे सत्य शिवासमोर आणले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader