‘शिवा’ (Shiva) मालिकेत सतत नवीन काहीतरी घडताना दिसते. आता मालिकेत शिवा-आशूमध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत. आशूने कीर्तीने दाखवलेले शिवाविरुद्धचे खोटे पुरावे पाहून तिला घराबाहेर जायला सांगितले. तेव्हापासून शिवा तिच्या माहेरी राहते. आता शिवा घरातून बाहेर गेल्यानंतर सिताई व कीर्ती आशूने दुसरे लग्न करावे यासाठी हट्ट करताना दिसतात. त्यांनी आशूचे नेहाबरोबर लग्नही ठरवले आहे. नेहाने शिवाच्या सांगण्यावरून या लग्नाला होकार दिला आहे. आशूने मात्र या लग्नाला अद्याप होकार दिलेला नाही. आता नेहा व शिवाने आशूची नाराजी दूर करण्यासाठी एक प्लॅन तयार केला. त्यानुसार शिवा आशूला लग्नाला होकार दे, असे सांगत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा शिवाला सांगते की, आशूच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल प्रेम आहे; पण तो तुझ्यावर नाराज आहे. आपल्याला काहीही करून त्याचं मन वळवायला पाहिजे. शिवा तिला म्हणते की, माझ्याकडे भारी आयडिया आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, शिवा व आशू समोरासमोर आले आहेत. आशू शिवाला म्हणतो, “हे काय आहे?, शिवा, तुला ना भीती वाटते की मी तिला होकार देईन.” त्यावर शिवा त्याला म्हणते, “तू दे होकार, मला तेच हवंय.” आशू तिला म्हणतो, “हे बघ शिवा, तू पस्तावशील.” शिवा म्हणते, “हो. दे ना होकार, ते तर लग्न करूनसुद्धा पस्तावले नाही.” आशू गाडीत बसत तिला म्हणतो, “आता दाखवतोच तुला.” शिवा त्याला ‘जा रे जा’ असे म्हणताना दिसत आहे. आशू तिथून गेल्यानंतर ती त्याच्यावर हसताना दिसत आहे.

Shiva
Video: “तर ती माझ्या प्रेतावरून…”, आईचा विरोध पत्करून आशू शिवाला निवडणार; सर्वांसमोर देणार प्रेमाची कबुली, पाहा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Shiva
Video : “तुला काहीतरी सांगायचंय…”, शिवाचा विश्वास खरा ठरणार, आशू त्याचे प्रेम व्यक्त करणार; पाहा नेमकं काय घडणार
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Shiva
Video: आशू भर मंडपात शिवाबरोबरच्या घटस्फोटाचे पेपर फाडणार तर सारंग सावलीला…; मालिकांमध्ये येणार मोठा ट्विस्ट, पाहा
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “हटके ‘शिवा’ स्टाईलने बदलेल का नाराज आशूचं मन?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवा व नेहा यांनी आशूची नाराजी दूर करण्यासाठी एकत्रितपणे एक प्लॅन बनविला आहे. त्यानुसार आशूचा मित्र, पाना गँग सगळेजण आशूला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आशू व शिवाचे आता ज्या ठिकाणी भांडण झाले, त्याच ठिकाणी ते पहिल्यांदा भेटले होते.

हेही वाचा : “प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”

आता आशूचे मन वळविण्यासाठी शिवा नक्की काय करणार, तिचा प्लॅन यशस्वी होणार का की नेहाबरोबरच्या लग्नाला आशू तयार होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader