छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवांगी जोशी. शिवांगीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. दरम्यान सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधणारी ही अभिनेत्री सध्या रुग्णालयामध्ये भरती आहे. रुग्णालयामधील फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली.
आणखी वाचा – …म्हणून १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खानने किरण रावबरोबर घेतला घटस्फोट; अभिनेत्यानेच केला होता खुलासा
शिवांगीला किडनी इन्फेक्शनचा सामना करावा लागत आहे. यामुळेच तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. शिवानीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रुग्णालयामधील फोटो शेअर करत आता प्रकृती नेमकी कशी आहे याबाबत माहिती दिली. या फोटोमध्ये ती अगदी हसताना दिसत आहे. तसेच शिवानी नारळाचं पाणी पित आहे.
शिवानी म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून मला किडनी इन्फेक्शनचा सामना करावा लागत आहे. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की, कुटुंबीय, मित्र परिवार, डॉक्टर, रुग्णालयामधील कर्मचारी व देव कृपेने माझ्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. तुम्हीही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या याची मी तुम्हाला आठवण करुन देते”.
आणखी वाचा – Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक
पुढे ती म्हणाली, “मी लवकरच कामाला सुरुवात करेन. प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तुम्हा सर्वांना खूप प्रेम”. शिवानीची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते चिंतेत आहेत. शिवाय तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही शिवानीला देत आहेत. शिवानीने ‘बालिका वधू २’, ‘खतरों के खिलाडी १२’मध्येही काम केलं आहे.