Shivani Mundhekar Fitness and Diet Plan : आरोग्य, फिटनेस, डाएट, डेली रूटीन याबद्दल हल्ली अनेक जण बोलताना दिसतात. विशेष करुन अनेक सेलिब्रिटी नियमितपणे या गोष्टींकडे लक्ष देतात. स्क्रीनवर चांगलं दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी ही मंडळी हे करत असतात. परंतु, कलाकारांना त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून यासाठी वेळ काढणं कधी कधी आव्हानात्म होतं.

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडिया मार्फत त्यांच्या फिटनेसचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात. काही जण तर घरी वेळ मिळत नसल्याने सेटवरच व्यायाम करतात आणि पूर्ण दिवसांचा आहार त्यांच्याबरोबर सेटवर घेऊन जातात. यापैकीच एक म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकर.

शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. अभिनेत्री अनेकदा मालिकेच्या सेटवरचे गमती जमती करतानाचे फोटो, घरातील कँडिड फोटो आणि व्यायाम करतानाचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. शिवानी अनेकदा ती काय खाते आणि तिचा डाएट प्लॅन कसा असतो याबद्दल सोशल मीडियावरुन सांगत असते. अशाताच आता अभिनेत्रीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती काय खाते आणि तिच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो हे पाहायला मिळतं.

शिवानीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती दिवसभर काय काय खाते याची माहिती मिळत आहे. यामध्ये नारळपाणी, अंडी, पोळी भाजी, स्मुदी असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळत आहे. शिवानी नेमकं काय खाते आणि तिचा आहार कसा असतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

नारळपाणी, चिया सिड्सचा आहारात आहे समावेश

शिवानीने इ्न्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केलेल्या फोटमध्ये ती नारळ पाणी पिताना दिसत आहे. तर याचसह या फोटोमध्ये एक स्मुदी आणि चिया सिड्स टाकून पाण्याने भरलेला जग दिसतोय. याचाच अर्थ अभिनेत्री चिया सिड्स टाकून पाणी पिते. उन्हाळ्यामध्ये हे शरीरासाठी चांगलं मानलं जातं. याचसह ती नारळपाणीसुद्धा पित आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या आहारात फळांचा समावेश असल्याचंही दिसतं.

शिवानीची घरगुती जेवणाला पसंती

शिवानीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक विविध पदार्थांनी भरलेलं ताटही दिसत आहे. शिवानीने शेअर केलेल्या या फोटोमधील ताटात मिक्स कडधान्य असलेली भाजी, शिमरा मिर्चची भाजी, ठेचा, दही आणि पोळी असल्याचं दिसतं. शिवानीच्या ताटात सर्व पौष्टीक आणि घरगुती पदार्थ असल्याचं स्पष्ट होतं. याचाच अर्थ तिच्या डाएट प्लॅनमध्ये घरगुती पदार्थांना महत्त्व असून यामधून ती व्यायामाबरोबर घरगुती पौष्टीक पदार्थांचं सेवन करुन फिट राहण्याचा प्रयत्न करते.

शिवानीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अजून एक ताट पाहायला मिळतं. ज्यामध्ये उकडलेली अंडी आहेत. ज्यामधील पिवळा भाग काढण्यात आलाय आणि त्याचबरोबर या ताटात काकडीसुद्धा आहे. शिवानीच्या ताटामध्ये दही, काकडी असे पोटाला थंडावा देणार पदार्थ दिसतात.