Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding Updates : मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने या दोघांचं केळवण केलं होतं. यानंतर या दोघांच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे.

शिवानी ( Shivani Sonar ) आणि अंबर हे दोघंही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. आजवर दोघांनीही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनी गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर चाहते या दोघांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता येत्या दोन दिवसांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

Groom walks through traffic to chase his Barat
लग्नाची वरात गेली निघून अन् नवरदेव अडकला वाहतूक कोंडीत….पुढे काय झाले? पाहा Viral Video
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Loksatta chaturang TV series Shooting Artist Acting Profession Work
बारमाही : इतनेमें इतनाही…
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”

शिवानी व अंबर यांची लग्नपत्रिका

ग्रहमख विधी झाल्यावर या दोघांचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. मेहंदी सोहळ्यात या दोघांनी Twinning केल्याचं पाहायला मिळालं. अंबर आणि शिवानी या दोघांनी मेहंदी सोहळ्यातील सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय या दोघांच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आली आहे.

अंबर आणि शिवानी येत्या २१ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. यावर शिवानी आणि अंबर या दोघांच्या नावाची फोड करून ‘#Ambani’ हा हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आला आहे.

Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding
Shivani Sonar & Ambar Ganpule Mehendi Ceremony ( शिवानी व अंबर लग्नपत्रिका )
Shivani Sonar Mehendi News
Shivani Sonar Mehendi News ( शिवानी सुर्वे मेहंदी )

दरम्यान, अंबर-शिवानीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla ), ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ अशा मालिकांमध्ये झळकली आहे. आता लवकरच शिवानी आणि अंबर यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Story img Loader