ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. १५ ऑगस्टला सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. आतापर्यंत सिंधुताईंच्या बालपणीची गोष्ट म्हणजे चिंधीची गोष्ट दाखवण्यात आली. पण आता लवकरच मोठी चिंधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे शाहरुख खानचा ‘डंकी’? सोशल मीडियावर होतोय ट्रोल

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत छोट्या चिंधीची भूमिकेत बालकलाकार अनन्या टेकवडेने पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेते किरण माने सिंधुताईंचे वडील अभिमान साठे आणि अभिनेत्री योगिनी चौक सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. तर प्रिया बेर्डे यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांच्या भूमिका साकारली आहे. सध्या मालिकेत चिंधीच्या लग्नासाठी अण्णा विरोध करताना पाहायला मिळत आहे. पण अशातच आता लवकरच मालिकेत मोठ्या चिंधीची एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. यासंबंधीत पोस्ट ‘मराठी टेल बझ’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत चिंधीच्या गोष्टी नंतर आता सिंधुची गोष्ट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण मोठी चिंधी कोण साकारणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच दुसऱ्याबाजूला मोठी चिंधीची भूमिका ‘राजा रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता खरंच मोठ्या चिंधीच्या भूमिकेत शिवानी सोनार झळकणार का? हे येत्या काळात उघडकीस होईल.

Story img Loader