Marathi Actress Reveals Her Baby Boy Name : ‘शुभविवाह’ या लोकप्रिय मालिकेतील ‘पौर्णिमा’ म्हणजेच अभिनेत्री कुंजिका काळविंटनं घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं. कुंजिकानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करीत पुत्ररत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. अशातच आता अभिनेत्रीच्या लाडक्या लेकाचं बारसंसुद्धा पार पडलं आहे.

बाळ झाल्याच्या बरोबर एका महिन्यानंतर कुंजिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मुलगा झाल्याची गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं तिच्या बाळाचा हात घेतल्याचा फोटो शेअर करीत “आमच्या आयुष्यात एका सुंदर आणि गोड मुलाचं आगमन झालं आहे. गेले चार आठवडे झोप न मिळालेल्या रात्री, बाळाला कडेवर घेऊन मारलेल्या गप्पा आणि शब्दांत वर्णन न करता येणारं प्रेम अशा भावनांनी भरलेलं होतं” असं म्हटलं होतं.

मुलगा झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर आता तिच्या लाडक्या मुलाचं बारसंसुद्धा पार पडलं आहे. अभिनेत्रीनं या बारशाचे काही खास क्षण आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये कुंजिका आणि तिच्या पतीनं हातांत बाळाला घेतल्याचं दिसत आहे.

कुंजिकानं मुलाचं नाव कान्हा, असं ठेवलं आहे. ‘कान्हा’ हे नाव श्रीकृष्णाशी संबंधित असल्यानं तिनं म्हटलं आहे. मुलाच्या नावासह दहीहंडी असल्याचंदेखील सोशल मीडियावरील फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोत त्यांनी लाल रंगाची थीम ठेवली होती. कुंजिकानं लाल रंगाची साडी परिधान केली आहे; तर तिच्या नवऱ्यानंही लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. इतकंच नव्हे, तर तान्ह्या बाळाच्या अंगावरही लाल रंगाचा कुर्ता आणि धोतर असा वेश आहे.

kunjika kalwint reveals her baby boy name kanha
कुंजिका काळविंटनं केलं मुलाचं बारसं (फोटो : इन्स्टाग्राम)

कुंजिकानं आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. स्वामिनी या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘ती परत आलीये’ या हॉरर मालिकेतसुद्धा तिनं काम केलं आहे. आई होण्याआधी ती स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. गरोदरपणामुळे तिनं मालिकेतून एक्झिट घेतली. सध्या ती मातृत्वाचा आनंद अनुभवत आहे.