अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. दोघांनीही ते फक्त चांगले मित्र आहेत असे स्पष्ट केले आहे. तरीही या चर्चा काही थांबल्या नाहीत. आता पलक तिवारीची आई टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

श्वेता तिवारीने सांगितले आहे की या सर्व अफवा आहेत. आणि अशा अफवांमुळे तिला त्रास होत नाही. एका अलीकडील मुलाखतीत, श्वेताने पलकच्या डेटिंगच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा सोशल मीडियावरील चर्चांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. 

हेही वाचा…Video : “हजारों जवाबों में खामोशी अच्छी…”, दिलजीत दोसांझने लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केले डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मरण; म्हणाला…

श्वेता म्हणाली, “या अफवांमुळे आता मला त्रास होत नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये, मला हे जाणवले आहे की अशा अफवांकडे लोकांचे लक्ष फार फार तर चार तास असते. अशा बातम्या ते नंतर विसरून जातात, मग का काळजी करायची? या अफवांनुसार तर, माझी मुलगी प्रत्येक तिसऱ्या मुलाला डेट करत आहे. या अफवांनुसार मी दरवर्षी लग्न करत आहे. इंटरनेटवर असणाऱ्या विविध माहितीच्या (खोट्या माहितीच्या) मते, मी आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. या सगळ्याचं आता मला आता काहीही वाटत नाही. जेव्हा सोशल मीडिया नव्हतं आणि काही पत्रकार चांगल्या गोष्टी लिहिण्याऐवजी नकारात्मक गोष्टी पसरवायचे. तेव्हा या गोष्टींचा त्रास व्हायचा. कलाकारांबद्दलची नकारात्मकता जास्त विकली जाते. त्या काळात जे झेललं ते पाहता, आता हे मला काहीही वाटत नाही,” असे श्वेता तिवारी यांनी SCREEN ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

२०२२ मध्ये पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान पहिल्यांदा एकत्र फिरताना दिसले होते. त्यानंतर ते मुंबईतील एका कॉन्सर्टमध्येही बरोबर दिसले होते. यामुळे नेटिझन्सना वाटले की ते डेट करत आहेत. 

हेही वाचा…Video : आशा भोसले यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘तौबा तौबा’ गाणे गात धरला ठेका, केली विकी कौशलची प्रसिद्ध हूकस्टेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, सिद्धार्थ कन्नन यांच्या एका मुलाखतीत पलकने स्पष्ट केले की ते फक्त ‘चांगले मित्र’ आहेत. “आम्ही एकदा एकत्र बाहेर होतो आणि तेव्हा पापाराझींनी आमचे एकत्र फोटो काढले.  खरं तर, आम्ही अनेक लोकांबरोबर होतो. फक्त आम्ही दोघे नव्हतो. पण तसं दाखवलं गेलं. लोकांना ते आवडलं, आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही कधी कधी बोलतो, एवढंच,” असे पलकने सांगितले.  कामाबद्दल बोलायचे झाले तर पलक तिवारी शेवटची सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती.