scorecardresearch

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

Mitali Mayekar
मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही कायमच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. नुकतंच मितालीने अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा अंघोळ करतानाचा फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तिने ‘अपवित्र’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी सिद्धार्थच्या प्रेमात पडले कारण…”, वाढदिवसानिमित्त मितालीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

मिताली ही सध्या मध्य प्रदेशात फिरण्यासाठी गेली आहे. तिने शेअर केलेला हा फोटो बांधवगड जंगल सफारीदरम्यानचा आहे. हे जंगल व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगभरातील वाघांचे दर्शन होतं, असं म्हटलं जाते.

सध्या मिताली ही व्याघ्र सफारीचा आनंद घेताना दिसत आहे. पण तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे सर्वजण थक्क झाले आहेत. मितालीच्या या फोटोवर अनेक नेटकरी कमेंट करत तिला विविध सल्ले देताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित

दरम्यान मितालीने वयाच्या १३ व्या इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून झळकली. त्याबरोबर ती ‘उर्फी’ या चित्रपटातही दिसली होती.

तसेच २०१६ मधील ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून तिने सायली बनकर नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याबरोबर हल्लीच मितालीने टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन केले. तिने ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत ‘कस्तुरी साटम’ हे पात्र साकारले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 12:28 IST