Siddharth Jadhav New Car Video: ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे दुसरे पर्व काही महिन्यांपूर्वी संपले. २१ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरू झाले होते, ते ३ मार्च २०२४ रोजी संपले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ जाधवने केले होते. या शोसाठी त्याला ‘धिंगाणेबाज परफॉर्मर’चा अवॉर्ड मिळाला होता, त्या अवॉर्डबरोबरच त्याचा नवीन कार मिळाली आहे.

सिद्धार्थने कारची कागदोपत्री प्रक्रिया पार पाडून त्याची पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थच्या मुली व त्याची बायको पूजा करताना दिसतात. सिद्धार्थने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्टार प्रवाहचे कारसाठी आभार मानले आहेत.

औरंगाबादमध्ये जन्म, दमदार पदार्पण अन् सुपरहिट सिनेमे करून बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय अभिनेत्री

सिद्धार्थ जाधवची पोस्ट

“न मागताच मिळाले आज खूप काही…
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग.
कारण खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन आयडॉल’च्या फायनलनंतर अभिजीत सावंतला होंडा सिटी मिळाली होती.
अन् ते बघून खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर “आता होऊ दे धिंगाणा” सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शोवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे.
खुप मस्त वाटतंय.
आता होऊ दे धिंगाणा..!” असं कॅप्शन देत सिद्धार्थ जाधवने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो नारळ फोडून गाडीची पूजा करताना दिसतो. नंतर तो मुलीबरोबर कारच्या बोनेटवर केक कापताना दिसतो. सिद्धार्थच्या पत्नीनेही गाडीची पूजा केली. त्यानंतर सिद्धार्थ गाडीबरोबर पोज देताना दिसतोय.

अवघ्या २३ व्या वर्षी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह केली पूजा; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक

जयवंत वाडकर, तेजस्विनी लोणारी, रसिका वेंगुर्लेकर, मेघना एरंडे, शर्वरी जोग यांनी कमेंट्स करून नवीन गाडीसाठी सिद्धार्थचे अभिनंदन करत आहेत. चाहतेही सिद्धार्थच्या या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader