Marathi Actor Siddharth Khirid Girlfriend : आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. याशिवाय रिलेशनशिप ते लग्न या दरम्यानच्या काळात अनेकजण ड्रीम प्रपोजल, प्री-वेडिंग शूट करुन घेतात. गेल्या काही दिवसांमध्ये रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, अभिषेक गावकर, शाल्व किंजवडेकर अशा अनेक सेलिब्रिटींनी प्रेमाची जाहीर कबुली देत लग्न केल्याचं पाहायला मिळालं. आता या कलाकारांपाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेता सिद्धार्थ खिरीड घराघरांत लोकप्रिय झाला. काही दिवसांआधीच माझ्या आयुष्यातील ‘Single अध्याय संपला’ म्हणत अभिनेत्याने प्रेमाची कुबली दिली होती. गर्लफ्रेंडबरोबरचे रोमँटिक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, यावेळी सिद्धार्थने आपल्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा रिव्हिल केला नव्हता. त्यामुळे अभिनेत्याची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे? तिचं नाव काय आहे? असे बरेच प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. अखेर अभिनेत्याने सोशल मीडियावर ड्रिम प्रपोजलचे व्हिडीओ शेअर आपल्या होणाऱ्या बायकोचा फेस रिव्हिल केला आहे.

nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: सिद्धार्थ चोप्राने प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, प्रियांका चोप्राने वहिनीचं ‘असं’ केलं स्वागत, पहिला व्हिडीओ आला समोर
Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”

हेही वाचा : “माझ्याशी लग्न करायचं धाडस…”, नुपूर शिखरेचं आयरा खानबरोबर ‘आले तुफान किती…’ गाण्यावर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना

सिद्धार्थ खिरीडची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

सिद्धार्थ खिरीड सौंदर्यवती डॉ. मैथिली भोसेकरच्या प्रेमात आहे. तिने फ्लोरीडा इथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. याशिवाय पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.

मैथिली कॅनडात असते. त्यामुळेच अभिनेत्याने प्रपोज करतानाचे रोमँटिक फोटो शेअर करत त्यावर हटके कॅप्शन लिहिलं आहे. “दोन हृदय, दोन देश, दोन प्रोफेशन्स आणि त्यांची एक प्रेमकहाणी…या ड्रीम प्रपोजलचा व्हिडीओ लवकरच शेअर करेन” यापुढे सिद्धार्थने ‘She Said Yes’, ‘India To Canada’ असे हॅशटॅग्ज वापरले आहेत.

हेही वाचा : Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?

दरम्यान, सिद्धार्थ खिरीडने गर्लफ्रेंडचा चेहरा रिव्हिल केल्यावर रसिका वेंगुर्लेकर, अमृता देशमुख, दिव्या पुगावकर, स्वाती देवल, वनिता खरात, भूमिजा पाटील, मधुरा जोशी, आशुतोष गोखले, ओंकार राऊत या सगळ्या कलाकारांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader