Premium

Video : “बाबा सलग ३३ वर्षे…”, मुग्धा वैशंपायनचे वडील झाले सेवानिवृत्त! गायिकेने शेअर केले भावनिक क्षण

Video : “बाबा सेवानिवृत्त झाले”, मुग्धा वैशंपायनची वडिलांसाठी भावनिक पोस्ट, म्हणाली…

mugdha vaishampayan shares emotional video from retirement ceremony of her father
मुग्धा वैशंपायनचे वडील झाले सेवानिवृत्त

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. मुग्धाने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गायिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील विविध अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मुग्धाने नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुग्धाचे वडील गेल्या ३३ वर्षांपासून नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुग्धाचे वडील भगवान वैशंपायन सेवानिवृत्त झाले. या समारंभातील काही भावनिक क्षण एका व्हिडीओच्या माध्यमातून मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : “स्त्रियांचे डोळे वाचता आले पाहिजेत”, ‘झिम्मा २’च्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “एक पुरुष म्हणून…”

मुग्धाने या संपूर्ण व्हिडीओमध्ये वडिलांचं ऑफिस, आजूबाजूचा परिसर आणि त्यांच्या सत्कार समारंभातील भाषणाची झलक दाखवली आहे. या पोस्टमध्ये गायिका लिहिते, “३० नोव्हेंबर २०२३, बाबा गेली सुमारे ३३ वर्षे नागोठणे येथील IPCL / रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होतात. सलग ३३ वर्ष एकाच ठिकाणी, एकाच प्लांटमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचं आणि आमचं सुद्धा कंपनी बरोबर भावनिक नातं होतं, आजही आहे…३० नोव्हेंबरला बाबा रिटायर झाले…त्या दिवसाचे काही भावनिक क्षण”

हेही वाचा : ठरलं तर मग : “कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर लग्न…”, सायली अर्जुनला देणार ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, मालिकेत पुढे काय घडणार?

दरम्यान, मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने या व्हिडीओवर, “मुग्धा, तुझ्या बाबांचे खूप कौतुक की, ज्यांनी तुझ्यासारख्या मुलीला घडवले.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, अन्य काही नेटकऱ्यांनी “तुझ्या बाबांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singer mugdha vaishampayan shares emotional video from retirement ceremony of her father sva 00

First published on: 04-12-2023 at 17:15 IST
Next Story
“सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍या…”, तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट