scorecardresearch

Premium

प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती झालंय हे माहितेय का? गायकाची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

आज त्याचा वाढदिवस आहे. तर त्याने स्वतः त्याचं शिक्षण किती झालं आहे याचा खुलासा केला होता.

Prathamesh education

प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. आज त्याचा वाढदिवस. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून प्रेक्षक त्याला बघत आले आहेत. त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं. गायनाबरोबरच तो शिक्षणातही पुढे आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याचं शिक्षण किती झालं आहे याचा खुलासा केला होता.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केल्यानंतर त्यांच्याबद्दल चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. मध्यंतरी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांनी मिळून त्यांचा एक व्हिडीओ यू ट्यूबवर पोस्ट केला. त्यात प्रथमेशने त्याचं शिक्षण किती झालं आहे? हेही सांगितलं.

badshah
आपल्या चाहतीला बादशाहने स्वतःकडची ‘ही’ महागडी वस्तू दिली भेट; रॅपरची कृती ठरली कौतुकास्पद
Pruthvik
‘ही’ लोकप्रिय मराठी गायिका आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची क्रश, नाव सांगत म्हणाला, “मला जशी ती आवडते तशी…”
Tejashree education
‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली आहे मोठी! तेजश्री वालावलकरची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
mrunal divekar
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

आणखी वाचा : “तो माझा सासरा आहे पण…”, स्पृहा जोशीने दिली तिच्या आणि प्रथमेश लघाटेच्या नात्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…

तो म्हणाला, “मी मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी मिळवली आहे. याचबरोबर त्यानंतर पुण्याच्या भारती विद्यापीठातून MA in Music मी पूर्ण केलं आहे.” प्रथमेशच्या शिक्षणाबद्दल कळल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचं खूप कौतुक केलं.

हेही वाचा : प्रथमेश लघाटेने कमी केलं १४ किलो वजन, सिक्रेट शेअर करत म्हणाला, “मी रोज…”

तर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर मुग्धानेही प्रथमेशबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singer prathamesh laghate reveals about his educational background know about it rnv

First published on: 29-09-2023 at 13:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×