’इंडियन आयडल’ फेम लोकप्रिय गायिका सायली कांबळे आई झाली आहे. सायलीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

सायली कांबळेने तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. काही महिन्यांपूर्वी सायलीने पोस्ट करून ती गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. आता सायलीची प्रसूती झाली असून तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

सायली कांबळेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ‘एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचे प्रेम… आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद,” असं कॅप्शन सायलीने दिलं आहे. सायली कांबळेला १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलगा झाला.

Award Banner

पाहा पोस्ट

सायली कांबळेने ही पोस्ट शेअर केल्यावर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सायली व तिचा पती धवल पाटील यांनी लग्नानंतर तीन वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.

सायली कांबळे ‘इंडियन आयडल’च्या १२ व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. तिने या शोमध्ये आपल्या सुमधुर आवाजाने देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. गायिका सायली कांबळेने या शोमध्ये अनेक गाणी गायली होती. सायली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिची गाणी, इव्हेंटमधील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

दरम्यान, सायली कांबळे हिने २४ एप्रिल २०२२ रोजी बॉयफ्रेंड धवल पाटीलबरोबर लग्न केलं. आता लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी सायली व धवल दोघेही आई-बाबा झाले आहेत.